Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देणाऱ्या शिक्षकांमध्येच मारहाण;एका शिक्षाकाचा मृत्यू



     उस्मानाबाद : उस्मानाबाद शहरातील कुरणेनगर भागात एका शिक्षकाने दुसऱ्या शिक्षकाची आर्थिक देवाण घेवाणीमधून डोक्यात दगड घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दोघंही मित्र असलेल्या या शिक्षकांमध्ये काही आर्थिक कारणांवरुन वाद झाला. त्यानंतर हा एवढा विकोपाला गेली की त्यांच्यात मारहाण झाली. या मारहाणीत एका शिक्षाकाचा मृत्यू झाला.

        उस्मानाबाद शहरातील भोसले हायस्कुल येथे असलेल्या शामराव देशमुख या शिक्षकाच्या डोक्यात आरोपी शिक्षक धीरज हुंबे यांनी दगड घालून हत्या केली. आर्थिक देवाण घेवाणीवरुन ही हत्या झाल्याचं समोर आलं असून उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी कलम ३०२ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोघेही एकाच शाळेत नोकरीस असून दोघेही कुरणेनगर भागात राहायला होते. विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देणाऱ्या शिक्षकांमध्येच ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad