खासदार श्रंगारेंच्या आश्वासनानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चटणी भाकर आंदोलन तात्पुरते स्थगितःपटेल
लातूर,दि.२०ः शेतकर्यांच्या पिक विमा प्रश्नाच्या अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने खा.सुधाकर श्रंगारे यंाच्या निवासासमोर जाहीर केलेले २२ फेबु्वारीचे *चटणी -भाकर आंदोलन खासदार सुधाकर श्रंगारे यांच्याशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर,खासदारांनी सदर प्रश्न लवकरच सोडविण्याचे आश्वासन दिल्याने सदरील आंदोलन तुर्त स्थगीत करण्यात आले असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सत्तार पटेल यांनी येथे सांगितले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला आज सोमवारी आपल्या निवासस्थानी बोलावून चर्चा केली. यावेळी सत्तार पटेल यांनी शेतकर्यांच्या प्रश्नावर प्रदीर्घ चर्चा केली,पिक विमा सारखा प्रश्न किती गंभीर आहे याची दाहकता आपण संसदेमध्ये प्रामुख्याने मांडावी अशी आग्रहाची मागणी केली.हा प्रश्न मार्गी नाही लागल्यास भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.शेवटी खासदार शृंगारे यांनी शेतकर्याच्या प्रश्नाविषयी एक शेतकरी,आपला प्रतिनिधी म्हणून संसदेत भूमिका मांडली आहे व मंत्र्यांची ही चर्चा केली आहे आणि हा प्रश्न मार्गी लागेत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही अशी ग्वाही दिली २२ फेब्रुवारी रोजीचे चटणी भाकर आंदोलन तुर्त स्थगीत करावे,अशी विनंती केली. त्यामुळे नियोजित चटणी भाकर आंदोलन आम्ही तात्पुरते स्थगित करीत असल्याचे सत्तार पटेल यांनी सांगितले. यावेळी शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण कुलकर्णी,लातूर उस्मानाबाद जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र मोरे ,राजीव कसबे, श्रीराम दिघे,श्याम माने इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
लातूर