पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली :
पहाटेच्या शपथविधी प्रकरणी अजित पवारांनी बोलण्याची काय गरज आहे?, तो केवळ सरकार बदलायचा प्रयत्न झाला. पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली, त्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. एक प्रकारे शरद पवारांनी पहाटेच्या शपथविधीबद्दल माहिती असल्याचे कबुल केले आहे.
🗣️ भावी मुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर अजित पवार यांचे स्पष्टीकरण :
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर अजित दादा भावी मुख्यमंत्री असे होर्डिंग लावण्यात आले आहेत. यावर खुद्द अजित पवार यांनी 145 आमदारांच्या पाठिंब्याशिवाय मुख्यमंत्री होता येत नाही, त्यामुळे त्या बॅनरला मनावर घेऊ नका, असे म्हणत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
😎 नाना पटोलेंचे गंभीर आरोप:मंत्र्यांच्या गुंडांकडून कार्यकर्त्यांना धमकी :
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप नेते भय आणि दहशतीचे वातावरण पसरवत आहेत. भाजपचे खासदार, आमदार व मंत्र्यांचे गुंड कार्यकर्त्यांना दमदाटी करत आहेत. या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे केली आहे. नाना पटोले यांनी शिष्टमंडळासह पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची रात्री उशीरा भेट घेतली.
🎾 सानियाच्या कारकीर्दीची अखेर पराभवाने :
भारताची सर्वात यशस्वी महिला टेनिसपटू सानिया मिर्झाच्या यशस्वी कारकीर्दीची मंगळवारी अपयशी अखेर झाली. कारकीर्दीतील अखेरच्या स्पर्धेत खेळणाऱ्या सानियाला दुबई अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरीत पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. सानिया या स्पर्धेत अमेरिकेच्या मॅडिसन किजच्या साथीने खेळली.
🎬 नागराज खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवणार
नागराज मंजुळे यांनी पैववान राहिलेल्या खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याची घोषणा केली आहे. कोल्हापुरातील कुस्तीच्या मैदानातून नागराज यांनी ही घोषणा केली आहे. आता या सिनेमाची चाहत्यांना आणि कुस्तीप्रेमींना उत्सुकता आहे.