दिवसभरातील ताज्या घडामोडी
🚩 शिवजन्मोत्सव सोहळा, शिवनेरीवर नाराजीनाट्य :
आज शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्माचा सोहळा साजरा होत आहे. यावेळी छत्रपती संभाजीराजे छत्रपती हे देखील उपस्थित आहे. मात्र, माझ्यासोबत आलेल्या सर्व तरुण शिवभक्तांना जो पर्यंत किल्ल्यावर प्रवेश देत नाही, तो पर्यंत मी देखील किल्ल्यावर येणार नसल्याची भूमिका संभाजीराजे यांनी घेतली आहे. त्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजून काढण्याचा प्रयत्न देखील केला.
🗣️ संजय राऊत यांचा गंभीर आरोप; म्हणाले... :
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आरोप प्रत्यारोप होत असताना संजय राऊतांनी गंभीर आरोप केला आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह हिसकवण्यासाठी 2 हजार कोटी रुपयांचा सौदा झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचे संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरेंनी 'मातोश्री' बाहेर येऊन शिवसैनिकांना संबोधन केल्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत हा गौप्यस्फोट केला.
🇮🇳 भारताने ऑस्टे्लियाला हरवले, आश्विन-जडेजाची मोलाची कामगिरी :
दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ऑस्टे्लिया संघाचा दुसरा डाव अवघ्या 113 धावांवर आटोपला. ज्यामुळे भारतीय संघाला विजयासाठी 115 धावांचे लक्ष्य मिळाले. भारताने हे लक्ष्य 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. निर्णायक खेळी करणारा आर जडेजा सामनावीर ठरला.
🏏 सौराष्ट्र संघ पुन्हा ठरला रणजी चॅम्पियन :
रणजी ट्रॉफी 2022-23चा अंतिम सामना सौराष्ट्र आणि बंगाल संघांमध्ये खेळला गेला. या सामन्यात जयदेव उनाडकटच्या नेतृत्वाखालील सौराष्ट्राने मनोज तिवारीच्या बंगाल संघाचा दारुन पराभव केला. बंगाल संघाला त्यांच्या यजमानपदी खेळल्या गेलेल्या सामन्यात 9 विकेट्सने पराभव पत्कारावा लागला.
💐 टॉलिवूड अभिनेते तारक रत्न यांचे निधन :
तेलुगु देसम पक्षाचे नेते आणि टॉलिवूडमधील अभिनेते नंदमुरी तारक रत्न यांचे वयाच्या 39 व्या वर्षी निधन झाले आहे. मागील काही दिवसांपासून बंगळुरुमधील एका खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. शनिवार (18 फेब्रुवारी) उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.