🥳 जिल्हा परिषदेतील 13,500 पदांसाठी लवकरच परीक्षा :
जिल्हा परिषदांमधील गट क आरोग्य व इतर विभागातील संवर्गाच्या 13,521 रिक्त पदांसाठी मार्च 2019 मध्ये जाहिरात देण्यात आली होती. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी आयबीपीएस कंपनीसोबत सामंजस्य करार करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन पोर्टल विकसित करून लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच विधानसभेत दिली.
🗣️ खासदार बंडू जाधव यांनी टोचले ठाकरेंचे कान :
आता ठाकरेंशी निष्ठावंत राहिलेले परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव यांनीही आपल्या पक्षप्रमुखांना जाहीर मेळाव्यातून खडे बोल सुनावले.‘जर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे होते तर त्यांनी आदित्य यांना मंत्री करायला नको होते, जर त्यांना मंत्री करायचेच होते तर स्वत: मुख्यमंत्री व्हायचे नव्हते. कारण पक्षाचे नेतृत्व कुणाकडे तरी हवे होते. पण या दोघांनी खुर्च्या आटवल्या त्यामुळे गद्दारी झाली. सत्तेत अपेक्षित वाटा मिळाला नसल्याचे दु:खही त्यांनी व्यक्त केले.
😊 जगात सगळ्यात सुंदर ठरले भारतीय :
सौंदर्याच्या बाबतीत भारताने अमेरिकेसह जगभरातील देशांना मागे टाकले आहे. नुकतीच 50 आकर्षक दिसणाऱ्या देशांची यादी जाहीर करण्यात आली असून त्यात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिका दुसऱ्या, तर ब्रिटन तिसऱ्या क्रमांकावर आहे. पोर मोई या प्रसिद्ध स्विम वेअर ब्रँडने ही स्टडी केला आहे. या अहवालानुसार जपान चौथ्या स्थानावर, तर कॅनडा पाचव्या स्थानावर आहे.
✉ सिसोदिया प्रकरणी 9 विरोधी नेत्यांचे PM मोदींना पत्र :
दिल्लीचे उपमुख्यंमत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेप्रकरणी विरोधी पक्षांच्या 9 नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या नेत्यांत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचाही समावेश आहे. या पत्रात म्हटले आहे की, मनीष सिसोदिया यांच्या अटकेमुळे भारताचे एका लोकशाही देशातून हुकूमशाही शासन पद्धतीत रुपांतर झाल्याचे सिद्ध होते.
😎 भारताने ड्रॅगनला दिला चांगलाच झटका :
मेडिकल उपकरणांवर चीनवरील अवलंबित्व कमी करून त्याचा मोठा भाग जपानमधून आयात केल्याने कोट्यवधी डॉलरचा फटका चिनी कंपन्यांना बसणार आहे. भारताचे विश्वासू सहकारी राष्ट्र जपानच्या कंपन्यांना भारतीय बाजारपेठेत चांगला जम बसवण्याची संधी मिळेल. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार या निर्णयामुळे उपकरणांच्या बाबतीत सामान्य रुग्णांना लाभ मिळेल.
No comments:
Post a Comment