सल्लोड कन्नड रोडवर वांगी बुद्रुक फाट्याजवळ एसटी बस आणि पिक अपचा भयंकर अपघात पिकप चालक ,१ ठार २७, जखमी
सोयगाव ( प्रतिनिधी यासीन बेग)
कन्नड सिल्लोड रोडवरील सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक फाट्याजवळ सिल्लोड पाचोरा बस तसेच गॅस सिलिंडरची वाहतूक करणारी पिकअप यांचा भिषण अपघात झाला. पिकप चालक ठार तसेच बस ड्रायव्हर गंभीर जखमी झालेला असुन बसमधील अनेक प्रवाशी सुद्धा गंभीर जखमी झालेले आहेत.
शुक्रवार दिनांक ३ मार्च २०२३ सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सिल्लोड तालुक्यातील वांगी फाट्याजवळ एसटी बस आणि पिकअप चा भीषण अपघात झाला. अपघातात ३० पेक्षा अधिक जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच नॅशनल सुत गिरणीचे संचालक अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांनी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली. यावेळी अब्दुल आमेर यांनी जखमींची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.अपघाताची तीव्रता व उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची संख्या पाहता अब्दुल आमेर यांनी जखमींना तातडीने उपचार मिळावा यासाठी शहरातील खाजगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांना तसेच रुग्णवाहिकांशी संपर्क साधून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात पाचारण केले. तसेच अपघातात ज्यांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी व इतर रूग्णालयात दाखल करण्यासाठी अब्दुल आमेर यांनी उपाययोजना केल्या.
यावेळी न.प. गटनेता नंदकिशोर सहारे, राजेंद्र ठोंबरे, नगरसेवक शेख सलीम हुसेन, प्रशांत क्षीरसागर, राजू गौर, हाजी मोहमद हनिफ, प्रवीण मिरकर, फहिम पठाण, रवी गायकवाड, अमोल कुदळ, अब्रार देशमुख आदींनी अपघातातील जखमींना मदत कार्य केले.
जखमींची नावे पंडित बाबुराव शिंदे जांभई, सुभद्रा गणेश मोरे भराडी ,शंकर जमदाडे मालोदे घाटना नांद्रा ,गणेश नारायण मोरे भराडी ,चंद्रभान सिताराम बनकर धावडा, रुबीना उस्मान पठाण कासोद ,सुनिता सोमनाथ बोंबले धामणगाव, सरस्वतीबाई आनंदा फोलाने उपळी ,युवराज नारायण पाटील देऊळगाव वाडी, कांचनाशक फोलाने उपळी. किसान शेळके चाननेरवाडी, मोहम्मद अकिल पटेल धामणी, अशोक बाबुराव मानकर, काळुबाई सुरेश फोलाने, मधुकर राजधर आमटे पाथरी, कृष्णा भानुदास राऊत पळशी, प्रेमसिंग अमरसिंग मनावर पळशी, भगवान तुळशीराम पांढरे दहिगाव, एकनाथ नांदगाव, मारू देवराम पाटील नांदगाव, रामा लक्ष्मण दांडगे घाटनांद्रा, सुनंदा नारायण फोलाने उपळी, तुकाराम कळवा सावळे बोरमाळ तांडा, दादा विठोबा तायडे, सुरेखा महेंद्र खरात वरम, देशमुख चांदणे, सलीमा मुंबई, कौतिक मोरे घाटनांद्रा अशी आहे. घटनास्थळी पोलीस उप विभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे, सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिताराम म्हेत्रे, पोलीस उप निरिक्षक आडे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले अशी माहिती सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिताराम म्हेत्रे यांनी दिली. न्यूज़ रिपोटर यासीन बेग सोएगाव
No comments:
Post a Comment