(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर ) :
🤝 पीकविम्याबाबत देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा :
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्ष 2023-24 अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी पीकविम्याबाबत मोठी घोषणा केली. शेतकऱ्यांना आता केवळी 1 रुपयांत पीकविमा काढता येईल, असे ते म्हणाले. तसेच शेतकऱ्यांना दरवर्षी 12 हजार रुपये मिळणार, अशी माहितीही त्यांनी दिली.
😊 अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी :
अर्थसंकल्पात फडणवीस यांनी अर्थसंकल्पात अशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविकांसाठी मोठी घोषणा केली आहे. या घोषणेनुसार आता आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये, गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये करण्यात येणार आहे. याशिवाय अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
🥳 धनगर बांधवांसाठी मोठी घोषणा! :
यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारने नूकसानग्रस्त शेतकऱ्यांसह धनगर बांधवाना दिलासादायक घोषणा केल्या आहेत. यामध्ये विशेषत: 22 योजनांचे एकत्रिकरण करण्यात येणार असून या योजनांची राज्य मंत्रिमंडळ शक्तीप्रदत्त समीतीमार्फत अमंलबजावणी करण्यात येणार आहे. या सहकार विकास महामंडळाचं मुख्यालय अहमदनगर जिल्ह्यात असणार आहे.
🚍 बस तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत :
अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या जनतेला मोठा दिलासा देण्यात आला आहे. तसेच, महिलांसाठीही अनेक महत्त्वाच्या तरतूदी करण्यात आल्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकारनं महिलांना सरसकट एसटी प्रवासात 50 टक्क्यांची सूट दिली आहे. तर महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण लागू करण्याचीही घोषणा केली आहे.
🏥 महात्मा फुले योजनेची व्याप्ती दीड लाखावरुन 5 लाखांपर्यंत
राज्यातील महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेची व्याप्ती आता दीड लाखावरून पाच लाख इतकी करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना आता पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळतील. तर राज्यभरात 700 नवीन स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना स्थापन करण्यात येणार असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं.
💐 सतीश कौशिक यांचे 66 व्या वर्षी निधन :
66 वर्षीय अभिनेते व दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे बुधवारी मध्यरात्री दिल्लीत हार्ट अटॅकमुळे निधन झाले. ते 8 मार्च रोजी एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी दिल्लीला गेले होते. तिथे रात्री अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण मध्यरात्री 1.30 वा. त्यांची प्राणज्योत मालवली.