💥 मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला :
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे. शिवाजी पार्कवरील मैदानात ते सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना हा हल्ला झाला. त्यांना हिंदुजा रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. आता त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.
🏥 सोनिया गांधींची प्रकृती बिघडली :
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना ताप व छातीतील संसर्गामुळे तातडीने दिल्ली स्थित सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्या वेगवेगळ्या तपासण्या करण्यात आल्या. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.
🔎 BJP आमदाराच्या मुलाला 40 लाखांची लाच घेताना अटक :
कर्नाटकात भाजपचे आमदार मदल विरुपक्षप्पा यांचा मुलगा प्रशांत कुमार यांना 40 लाख रुपयांची लाच घेताना गुरुवारी अटक करण्यात आली. वडिलांच्या बंगळुरू येथील कर्नाटक सोप अँड डिटर्जंट लिमिटेड (KSDL) कार्यालयातून ही अटक करण्यात आली. कर्नाटक लोकायुक्तांनी त्यांना लाच घेताना रंगेहात पकडले आहे.
🎬 Oscar सोहळ्यात दीपिका पदुकोणवर मोठी जबाबदारी :
यंदाचे ऑस्कर सोहळ्याचे हे 95 वे वर्ष आहे. दरम्यान बॉलिवूडसाठी एक आनंदाची बातमी आहे. बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण हिला यंदाच्या सोहळयात एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. या सोहळ्यात दीपिका पुरस्कार जाहीर करताना दिसणार आहे. तिने स्वत: सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे.
🏏 इंदूर कसोटीत भारताचा लाजिरवाणा पराभव :
ट्रेव्हिस हेड व मार्नस लाबुशेन यांच्या संयमी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने भारताविरोधातील बॉर्डर-गावसकर मालिकेतील तिसरा कसोटी सामना 9 गड्यांनी आपल्या नावे केला आहे. या विजयामुळे कांगारूंच्या संघाने मालिकेत 2 विरुद्ध 1 असे पुनरागमन केले आहे. या मालिकेतील शेवटचा सामना 9 ते 13 मार्चदरम्यान अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळला जाईल.