आजोबांनी शिट्टी वाजवली, टोपीही वाकडी केली; गौतमी पाटीलच्या कार्यक्रमातील भन्नाट VIDEO व्हायरल - latursaptrangnews

Breaking

Sunday, March 5, 2023

आजोबांनी शिट्टी वाजवली, टोपीही वाकडी केली; गौतमी पाटीलच्या कार्यक्रमातील भन्नाट VIDEO व्हायरल

 


आजोबांनी शिट्टी वाजवली, टोपीही वाकडी केली; गौतमी पाटीलच्या कार्यक्रमातील भन्नाट VIDEO व्हायरल



नाशिक : नाशिक जिल्ह्यात प्रथमच प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. नाशिकच्या निफाड तालुक्यात लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे बॅनर्स देखील निफाड शहरात लागले होते. या लावणी महोत्सवाला गौतमी पाटीलच्या चाहत्यांनी अक्षरशः तिकीट खरेदी करत गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.

निफाडमध्ये गौतमी पाटीलच्या नृत्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी तरुणांसह एका लावणीप्रेमी आजोबांनी देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. गौतमी पाटीलचा डान्स सुरू होताच आजोबांनी शिट्टी वाजवत टोपी वाकडी केली. आजोबांनी शिट्टी वाजवताच यावेळी तरुणांनीही टाळ्या आणि शिट्ट्यांनी गौतमीच्या डान्सला दाद दिली.


बदनामीचं विष पचवून पुन्हा स्टेजवर...

गौतमी पाटील हिचा मागील आठवड्यात काही विकृतांनी एक अश्लील व्हिडिओ व्हायरल केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समाजमाध्यमात तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. या माध्यमातून बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानंतरही गौतमी पाटील आता पुन्हा एकदा आपली नृत्यकला सादर करत सर्वांसमोर आली आहे. याबाबत माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता गौतमी पाटील म्हणाली की, 'व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई सुरू आहे. मी पोलिसांकडे काही मागणी करणार नाही. माझं पोलिसांसोबत बोलणं सुरू आहे. महिला आयोगाने माझ्या प्रकरणाची दखल घेतल्याने बरं वाटलं. आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या माझ्या पाठीशी आहेत. आरोपींवर ताबडतोब कारवाई करा, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत,' अशी माहिती नाशिकमध्ये गौतमीने दिली आहे. दरम्यान, यावेळी आपल्या कार्यक्रमात अनेक तरुणांकडून हुल्लडबाजी केली जाते, त्यांना काय आवाहन कराल, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर गौतमीने म्हटलं की, मला त्या प्रकरणावर काहीही बोलायचं नाही. माझी तशी आता मनस्थिती नाही. मला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे, असं ती म्हणाली.

No comments:

Post a Comment