वीज वाहिनी दुरुस्तीसाठी शनिवारी पाणीपुरवठा बंद राहणार - latursaptrangnews

Breaking

Thursday, April 27, 2023

वीज वाहिनी दुरुस्तीसाठी शनिवारी पाणीपुरवठा बंद राहणार



 वीज वाहिनी दुरुस्तीसाठी शनिवारी पाणीपुरवठा बंद राहणार

 

 मनपाची माहिती

 

     लातूर/ प्रतिनिधी: वीज वाहिनीची दुरुस्ती करण्यासाठी शनिवार दि.२९ एप्रिल रोजी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली.

    धनेगाव येथून लातूर शहराला पाणीपुरवठा केला जातो.यासाठी धनेगाव हेडवर्क्स येथील ३३ केव्ही सबस्टेशनला मुरुड सबस्टेशन येथून वीजपुरवठा केला जातो.मागील १५ दिवसांपासून अवकाळी पाऊसवादळी वारे व विजाचा परिणाम यामूळे वीजपुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिनीत वारंवार बिघाड होत आहेत.यामुळे वीजपुरवठा खंडित होत असून त्याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर होत आहे. त्यामुळे नागरिकांना वेळेत पाणीपुरवठा करता येत नाही.यासाठी शनिवार दि.२९ एप्रिल रोजी दिवसभर ही वीजवाहिनी बंद ठेवून वीज वाहिनीच्या परिसरातील झाडांच्या फांद्या तोडणे तसेच इतर दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.यामुळे शनिवार दि.२९  एप्रिल रोजी शहरात पाणीपुरवठा बंद राहणार असून नागरिकांनी सहकार्य करावे,असे आवाहन मनपा उपायुक्तांनी केले आहे.

No comments:

Post a Comment