Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    साडे सतरा लाखांची नवी कोरी कार खरेदी केली, दोन गाढवांच्या सहाय्यानं शोरुमला....

     


    साडे सतरा लाखांची नवी कोरी कार खरेदी केली, दोन गाढवांच्या सहाय्यानं शोरुमला....


    उदयपूर : राजस्थानातील एका कारचालकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कार खरेदी केल्यानंतर सर्व्हिस सेंटरकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्यानं गाडी साडे सतरा लाखांची गाडी गाढवांच्या सहाय्यानं ओढत आणि वाजत गाजत शो रुमवर आणण्यात आली. या घटनेच्या व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

    उदयपूरच्या सुंदरवास भागातील रहिवासी राज कुमार गायत्री यांच्या माहितीनुसार त्यांचे काका शंकरलाल यांनी १७.५० लाख रुपये खर्च करुन नवी कार खरेदी केली होती. मद्री औद्योगिक वसाहतीमधील शोरुममधून ही कार खरेदी करण्यात आली होती. कार खरेदी केल्यानंतर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. यानंतर त्यांनी डीलरसोबत संपर्क करुन समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

    कार मालकानं गाडी दोन वेळा सर्व्हिस सेंटरवर दुरुस्तीसाठी आणली होती, राज कुमार गायत्री यांनी सांगितलं. सर्व्हिस सेंटरशी संपर्क साधल्यानंतर कारच्या बॅटरीमध्ये प्रॉब्लेम असून काही वेळ ड्रायव्हिंग केल्यावर समस्या दूर होईल, असं शोरुमकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, तरी देखील समस्या दूर झाली नाही. त्यामुळं कार शोरुमला आणण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या कार शोरुममध्ये असून त्यांनी दुसरी कार देण्याची मागणी केली आहे.

    म्हणून वाजत गाजत शोरुम गाठलं


    शंकरलाल यांनी साडे सतरा लाख रुपये खर्च करुन कारची खरेदी केली होती. घरगुती कार्यक्रमासाठी जात असताना दोन वेळा कार बंद पडल्यानं शंकरलाल संतप्त झाले होते. त्यानंतर दोन वेळा डीलरकडून चांगली सुविधा न मिळाल्यानं गाढवांच्या सहाय्यानं गाडी ओडून आणत वाजत गाजत शोरुममध्ये जाण्याचा निर्णय घेतला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    दरम्यान, या प्रकरणी शोरुमची बाजू देखील समोर आली आहे. शोरुममधील प्रतिनिधीनं दिलेल्या माहितीनुसार कार मालकानं कारमध्ये काही बदल केले आहेत. त्यामुळं कारमध्ये इलेक्ट्रिक समस्या निर्माण झाल्या आहेत. आम्ही त्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय, असं ते म्हणाले.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad