धोत्रा येथे सिलबंद शासकीय पोषण आहारात निघाला भलामोठा उंदीर - latursaptrangnews

Breaking

Tuesday, April 25, 2023

धोत्रा येथे सिलबंद शासकीय पोषण आहारात निघाला भलामोठा उंदीर



 धोत्रा येथे सिलबंद शासकीय पोषण आहारात निघाला भलामोठा उंदीर


सिल्लोड तालुक्यात खळबळ


धोत्रा ता सिल्लोड येथे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभाग आयुक्तालय एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडीत देण्यात येणाऱ्या सिलबंद गव्हाच्या पॉकेटमध्ये सडलेला भलामोठा उंदीर निघाल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर व्रत असे की विश्वजित प्रमोदसिंग जाधव या लहान बाळाचे पोषण आहार अंतर्गत मिळणारे धान्य 2 दिवसा आधी घरी आणले होते

लहान मुलांना मिळणाऱ्या पोषण आहार अंतर्गत धान्य आणले यातील गव्हाचे सिलबंद पॉकेट मधून घरी शन्का आली म्हणून फोडून पाहिले असता  त्यात भलामोठा उंदीर निघाला यातून प्रचंड दुर्गन्ध येत होता.आता प्रश्न हा आहे की याची जबाबदारी कोण घेईल.व असे लहान मुलांच्या आरोग्याशी खेळणे योग्य नव्हे.याबाबत वरिष्ट अधिकारी काय निर्णय घेता ते पाहणे महत्वाचे ठरेल. आता हे धान्य पॅक करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांना शासन काय शासन करेल तेही पहाणे गरजेचे आहे

No comments:

Post a Comment