अहमदपूर येथे गुटक्‍याची कार साोडून चालक फरार - latursaptrangnews

Breaking

Tuesday, April 25, 2023

अहमदपूर येथे गुटक्‍याची कार साोडून चालक फरार



 अहमदपूर येथील विमलाबाई शाळा ते यशवंत विद्यालय या रस्त्यावर थांबलेल्या कार चालकाला पोलिसांनी हाटकले असता कार सोडून चालक पळून गेला. पोलिसांनी कारची झडती घेतली. त्यामध्ये गुटख्याचे 22 पोते आढळून आले. 3 मोबाईल आणि कारसह 4 लाख 21 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अहमदपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चालक सुदर्शन गोविंद घुगे यांनी अहमदपूर पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, दिनांक 24 एप्रिल रोजी पहाटे पेट्रोलिंग करीत असताना अहमदपूर येथील विमलाबाई शाळा ते यशवंत विद्यालय या रस्त्यावर एमएच 04 ईक्यू 7072 ही पांढऱ्या रंगाची कार थांबलेली दिसली.

या कारजवळ जाऊन चालकास खाली उतरवून त्याचे नाव विचारले असता तो कार जागेवर सोडून पळून गेला. त्याचा पाठलाग करूनही तो सापडला नाही. कारची झडती घेतली असता 6 कल्तानी पोत्यामध्ये नजर 9,000 असे लिहिलेले (किंमत 45 हजार रुपये), 8 कल्तानी पोत्यामध्ये राजनिवास पानमसाला सुगंधित तंबाखूसह गुटखा असलेले व 8 बॅग जाफरानी जर्दा (किंमत 41 हजार 600 रुपये), 3 लाख रुपयांची कार व 35 हजार रुपयांचे 3 मोबाईल, असा एकूण 4 लाख 21 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


No comments:

Post a Comment