हातभट्टी दारू तयार करणाऱ्या ठिकाणावर छापा, रेणापूर पोलीस ठाण्यात 3 जणांवर गुन्हा दाखल
स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने रेणापूर तालुक्यातील वसंतनगर तांडा महापूर येथे अवैधरित्या हातभट्टी दारू तयार करणाऱ्या ठिकाणी छापामारी केली. यामध्ये 3,040 लिटर रसायन, साहित्य, हातभट्टीची दारू असा एकूण किंमत 1 लाख 84 हजार रुपयांचे रसायन, हातभट्टी दारू आणि हातभट्टी निर्मितीचे साहित्य नष्ट करण्यात आले आहे. सुखदेव खंडू राठोड रा. वसंत नगर तांडा महापूर ता.जि. लातूर, गणेश राम राठोड रा. वसंत नगर तांडा महापूर ता.जि. लातूर व एक महिला अशा तीन जणांवर पोलीस ठाणे रेणापूर येथे कलम 65 (3) (ई) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे एकूण 3 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेच्या पथकामधील सहाय्यक फोजदार अंगद कोतवाड, पोलीस अंमलदार माधव बिल्लापट्टे, नवनाथ हसबे, तुराब पठाण, जमीर शेख, राजू मस्के, नकुल पाटील यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment