जुना औसा रोड भागातील घरफोडी करून 3 लाख 20 हजार रुपयांचा....

www.latursaptrangnews.com
By -
0

 





जुना औसा रोड भागातील घरफोडी करून  3 लाख 20 हजार रुपयांचा....


लातूर शहरातील देशपांडे निवास रत्नागिरी कॉलनी जुना औसा रोड भागातील घरफोडी करून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने रोख रक्कम असा एकूण 3 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज पळवून नेला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भगवान नामदेवराव पाटील रा. उटी ता. औसा .मु. स्नेह नगर परिवार सोसायटी औसा रोड लातूर यांनी तक्रार दाखल केली बंद घर असल्याचा फायदा घेवून अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील 1 तोळा वजनाची सोन्याची बोरमाळ (किंमत अंदाजे 30 हजार रुपये), सोन्याच्या पाटल्या दोन नग वजन 5 तोळे जुने वापरते (किंमत 1 लाख 50 हजार रुपये), सोन्याचे नेकलेस वजन 1.5 तोळे जुने वापरते (किंमत 45 हजार रुपये), सोन्याच्या अंगठ्या तीन नग प्रत्येकी वजन 1 तोळा असे 3 तोळे वजनाचे (किंमत 90 हजार रुपये) असा एकूण 10.5 तोळे सोन्याचे दागिने (किंमत 3 लाख 15 हजार रुपये), टायटन कंपनीची हातातील घड्याळ जुनी वापरती (किंमत 5 हजार रुपये) असा एकूण 3 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)
3/related/default