कालव्यात दिसली नोटांची बंडलं, गावकरी जमले; गोळा करण्यासाठी पाण्यात उतरले, मग काय..?
पाटणा: कालव्यात नोटांची बंडलं सापडत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. नोटा खोट्या आहेत की खऱ्या याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र नोटांची बंडलं पाहून अनेक जण कालव्यात उतरले. त्यांनी पाण्यावर तरंगणाऱ्या नोटा गोळा करण्यास सुरुवात केली. कालव्यातील बंडलं गोळा करणाऱ्या लोकांचा व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कालवा दिसत आहे. त्यात अनेक जण उतरले असून ते नोटांची बंडलं गोळा करत आहेत. पोलिसांनी अद्याप तरी घटनेला दुजोरा दिलेला नाही. व्हायरल झालेला व्हिडीओ बिहारच्या मुरादाबादमधील सासाराम येथील असल्याचा दावा केला जात आहे. मुरादाबादमधील कालव्यात १००, २०० आणि ५०० ची बंडलं आढळून आली आहेत.
कालव्यात पैशांची बंडलं तरंगताना पाहून लहान मुलं, तरुण, महिला, वृद्ध कालव्याच्या आसपास जमले. नोटांची बंडलं गोळा करण्यासाठी अनेक जण कालव्यात उतरले. नोटा खऱ्या आहेत की खोट्या, ते अद्याप समजू शकलेलं नाही. पण ही बंडलं कोणी फेकली, याची चर्चा सुरू आहे.

परिसरातील काही जणांनी नोटा पाण्यातून वाहून जाताना पाहिल्या. त्यांनी बंडलांचा पाठलाग केला. तेव्हा त्यांना कुराइचच्या पुलाखाली नोटांची अनेक बंडलं दिसली. कालव्यात नोटांची अनेक बंडलं सापडल्याची माहिती रोहतास पोलिसांना मिळाली. पोलिसांची पथकं घटनास्थळी पोहोचली. आता पोलीस व्हायरल व्हिडीओची सत्यता पडताळून पाहत आहेत. सापडलेल्या नोटा खऱ्या आहेत की खोट्या, त्याचा तपास केला जात आहे.
Tags
ताज्या बातम्या.