देशातील 'सेमी हायस्पीड ट्रेन' अशी ओळख असलेली देखणी वंदे भारत ट्रेन प्रवाशांच्या पसंतीला उतरली असली तरी तिचे लांबसडक असलेले नाक मात्र 'नकली' असल्याचे समोर आले आहे. वाऱयाच्या वेगाने धावणाऱया या गाडीचा अंदाज न आल्याने मोकाट जनावरे धडकण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे संबंधित जनावराचा बळी जात असून गाडीच्या दर्शनी भागाचेही मोठे नुकसान होत आहे. गेल्या अकरा महिन्यांत तब्बल 72 वेळा गाडीच्या दर्शनी भागाचे म्हणजेच नाक फुटण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वंदे भारतचे नाक नकली तर नाही ना, अशा चर्चा रेल्वे अधिकाऱयांमध्ये खासगीत सुरू आहेत. वंदे भारतची ताशी 180 किलोमीटर वेगाने धावण्याची क्षमता असून गाडीमध्ये विमानाच्या तोडीच्या सुविधा आहेत. सध्या ही गाडी देशभरातील वेगवेगळया 14 मार्गांवर वाऱयाच्या वेगाने धावते. देशभरातील कोणत्याच रेल्वे ट्रकला लोखंडी कुंपण किंवा भिंत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातून जाणाऱया रेल्वे ट्रक परिसरात अनेक मोकाट आणि पाळीव जनावरांचा वावर असतो. परिणामी सदर जनावराला गाडीच्या वेगाचा अंदाज न आल्याने त्यांना धडक बसण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. जूनपासून आतापर्यंत 72 जनावरांना वंदे भारतची धडक बसली आहे. गाडीचा दर्शनी भाग फायबर रिइन्पोसिंग प्लॅस्टिकचा वापर करून बनवला आहे. जनावराला किंवा अन्य घटकाला धडक बसल्यानंतर दर्शनी भाग तुटण्याच्या किंवा चेपण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे हे अपघात रोखण्यासाठी रेल्वेने ठिकठिकाणी ट्रकच्या बाजूने लोखंडी फेन्सिंग करण्याचे काम हाती घेतले आहे.
वंदे भारतची ताशी 180 किलोमीटर वेगाने धावण्याची क्षमता असून गाडीमध्ये विमानाच्या तोडीच्या सुविधा आहेत. सध्या ही गाडी देशभरातील वेगवेगळया 14 मार्गांवर वारयाच्या वेगाने धावते. देशभरातील कोणत्याच रेल्वे ट्रकला लोखंडी कुंपण किंवा भिंत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातून जाणाऱया रेल्वे ट्रक परिसरात अनेक मोकाट आणि पाळीव जनावरांचा वावर असतो. परिणामी सदर जनावराला गाडीच्या वेगाचा अंदाज न आल्याने त्यांना धडक बसण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. जूनपासून आतापर्यंत 72 जनावरांना वंदे भारतची धडक बसली आहे. गाडीचा दर्शनी भाग फायबर रिइन्पोसिंग प्लॅस्टिकचा वापर करून बनवला आहे. जनावराला किंवा अन्य घटकाला धडक बसल्यानंतर दर्शनी भाग तुटण्याच्या किंवा चेपण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे हे अपघात रोखण्यासाठी रेल्वेने ठिकठिकाणी ट्रकच्या बाजूने लोखंडी फेन्सिंग करण्याचे काम हाती घेतले आहे.