मुरुड ग्रामपंचायत म्हणजे खोकला गेलं पडस् आलं..!
मुरुड प्रतिनिधी(श्रीकांत टिळक) :- शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या वार्ड क्र. 4 ,रमाई नगर मधील विविध ठिकाणी ,मार्केट यार्ड रोड रस्ता ते रमाई नगर ते नरसिंह चौक रस्त्यावर दररोज नालीचे घाण पाणी साचत आहे. त्यामुळे या दुर्गंधीयुक्त पाण्यातूनच नागरिकांना ये-जा करावी लागत असून, स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रहिवाशांमधून केला जात आहे. तसेच खोकला गेलं पडस् आलं..! असेही शब्द ऐकावयास मिळत आहेत. तसेच नागरिकांनी परिवर्तन घडवून आणलेले आहे त्या नागरिकास त्रास होताना दिसून येत आहे. सिद्धिविनायक मंदिर , नालंदा बुद्ध विहार असून रोड वरून लेबर कॉलनी या भागातील नागरिकांना आदी ठिकाणी ये-जा करण्याचा हा प्रमुख मार्ग आहे. मात्र, रस्त्यावर नेहमी घाण पाणी साचलेले असते.
नालीच्या पाण्याला बाहेर येणाऱ्या पाण्याला योग्य दिशा मिळण्यासाठी नालीचे काम झालेले नाही,काही ठिकाणी तर नालीच नाही.त्यामुळे जवळपास दोन-तीनशे मीटर अंतरात घाण पाणी साचून राहते. या घाणीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. संबंधित अधिकाऱ्याने याकडे लक्ष घालून नाणीचे पाणी, नाली, पथदिवे नागरिकांच्या मूलभूत गरजाकडे ग्राम विकास अधिकारी, सरपंच ,उपसरपंच,गट विकास अधिकारी यांनी लक्ष केंद्रित करून योग्य तो मार्ग काढावा अशी मागणी नागरिकांना होत आहे.
दरम्यान, या भागात नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी सिमेंट रस्ता खोदून अनेक महिन्याचा कालावधी लोटला. परंतु मुरुड ग्रामपंचाययतीचे जलवाहिन्याचे हे काम अर्धवट राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच नवीन कनेक्शन जोडणे अद्यापही चालू नसल्यामुळे नळ जोडणी प्रक्रिया तात्काळ चालू करावी अशी नागरिकांतून मागणी होत आहे. ग्रामपंचायत आरोग्य समितीवर जा सदस्याचे नियुक्त केलेल्या आहे त्यांनी या या सदस्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित करावे व योग्य निर्णय घ्यावा, या भागातून ये-जा करत असताना नागरिकांना उघड्या सांडपाण्यामुळे आरोग्यास देखील धोका निर्माण झाला आहे. अशा नागरिकांत मागण्या होत आहेत.