मावीम मार्फत जिल्हा स्तरावर तीन पुरुषांचा “सुधारक सन्मान” पुरस्कार देवून गौरव - latursaptrangnews

Breaking

Monday, May 1, 2023

मावीम मार्फत जिल्हा स्तरावर तीन पुरुषांचा “सुधारक सन्मान” पुरस्कार देवून गौरव

 मावीम मार्फत जिल्हा स्तरावर तीन पुरुषांचा “सुधारक सन्मान” पुरस्कार देवून गौरव

महाराष्ट्र दिनाच्या ६३ व्या वर्धापन दिनी मा. जिल्हाधिकारी लातूर यांच्या हस्ते तिन्ही पुरुषांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देवून गौरव   

 महिला सक्षमीकरण करीता संवेदनशील गावपातळीवर महिलांच्या विकासाकरीता पुढाकार घेत असलेल्या तसेच समाजात स्त्रियांना समानतेने वागविणारे महिलांना माणूस म्हणून अधिकार जपणाऱ्या पुरुषांचासुधारकसन्मान म्हणून तीन पुरुषांचा जिल्हा क्रीडा संकुल लातूर येथे आयोजित महाराष्ट्र दिनाच्या ६३ व्या वर्धापन दिनी मा. जिल्हाधिकारी लातूर पृथ्वीराज बी.पी. यांच्या हस्ते मा श्री सोमय मुंडे, जिल्हा पोलिस अधीक्षक लातूर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री नागोराव वसंत पवार रा. सोनवती, ता. लातूर, श्री संग्राम गोविंदराव काचे रा. कौडगाव ता. अहमदपूर, श्री बीजसईत चंद्रकांत पाटोळे, रा. तावशी ताड, ता. औसाया तिन्ही पुरुषांचा पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देवून विशेष गौरव करण्यात आला

     महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) कडून आयफॅड सहाय्यित नव-तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर प्रकल्पाच्या  जेंडर अँड न्युट्रीशन या घटकाअंतर्गत वर्ष २०२२-२३ वर्षाच्या नियोजनाप्रमाणेजेंडर सेंन्सीटीव्ह रोल मॉडेल अवॉर्डहा उपक्रम राबविण्यात येत आहे, या मध्ये महिला सक्षमीकरण करीता संवेदनशील गावपातळीवर महिलांच्या विकासाकरीता पुढाकार घेत असलेल्या तसेच समाजात स्त्रियांना समानतेने वागविणारे महिलांना माणूस म्हणून अधिकार जपणाऱ्या, तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या पुरुषांचासुधारकसन्मान प्रदान करणे हा आहे, या उपक्रमाचा मूळ हेतू म्हणजे गावस्तरावरमेन जेंडर सेंन्सीटीव्ह रोल मॉडेल”  (“Men Gender Sensitive Role Model”) तयार होणे महिला सक्षमीकरणाकरीता पूरक वातावरण तयार करणे हा आहे. महात्मा ज्योतिबा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांनी महिलांचे हक्क अधिकार यासाठी लढा दिला. महिलांना माणूस म्हणून जगण्यासाठीचे हक्क शिक्षणाची संधी मिळवून देण्यास क्रांतिकारक काम केले केलेले आहे. या दोन महापुरुषांच्या कार्याची प्रसिद्धी जगभर आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांची दिनांक ११ एप्रिल २०२३ रोजी १९६ वी जयंती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची दिनांक १४ एप्रिल २०२३ रोजी १३२ वी जयंती निमित्ताने महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेत असलेल्या पुरुषांचा माहे एप्रिल २०२३ मध्येजेंडर सेंन्सीटीव्ह रोल मॉडेल अवॉर्डकरिता जिल्हा निवड समिती द्वाराजिल्हास्तरावर आशा पात्र तीन पुरुषांची निवड करण्यात आली होती. या करिता माविम कार्यरत लातूर, औसा, रेणापूर अहमदपूर तालुक्यातील सहा लोकसंचलीत साधन केंद्र अंतर्गत १७८ गावातून ३५६ नामांकन तालुका पातळीवर प्राप्त झाले होते, प्रत्येक तालुक्यातून तालुकस्तरीय समिती मार्फत तीन नावे अंतिम निवडीकरिता जिल्हास्तरीय समितीकडे निर्देशित करण्यात आले होते त्या मधून जिल्हा स्तरीय समित द्वारा अंतिम तीन पुरुषांची सदर पुरस्कार करिता निवड केली होती. निवड केलेल्या तिन्ही पुरुषांचा आज मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या वेळी मावीम चे जिल्हा समन्वय अधिकारी श्री मन्सुर पटेल, मावीम कार्यालयातील कर्मचारी श्री दीपक टेकाळे, परमेश्वर इंगळे, सूर्यकांत वाघमारे, अनंत हेरकर, श्रीमती सविता पाटील, विजया श्रीमंगले, श्री पद्याकर केदासे, विजय लोंढे, श्रीमती गोदावरी पवार सरोजा बनसोडे इत्यादि उपस्थित होते.       

 



No comments:

Post a Comment