रस्त्याच्या मध्ये भागी असणारा महावितरणाचा सिमेंटचा पोल काढा: भीम क्रांती संघ.
मुरुड प्रतिनिधी :- मोजे मुरुड तालुका जिल्हा लातूर येथील दत्तनगर भागातील रस्त्याच्या मध्यभागी असणारा महावितरणाचा सिमेंटचा पोल काढण्यासंदर्भात भिम क्रांती संघाचे संस्थापक अध्यक्ष जयदीप सुरवसे यांनी उपमुख्य कार्यकारी अभियंता मुरुड यांना निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात विस्तृत असे म्हटले आहे की, मुरुड येथील दत्तनगर क्रीडा संकुलाच्या जवळ महावितरणाची डीपी असून त्याच्या जवळ सिमेंट काँक्रीट चा रस्ता असून या रस्त्याच्या मध्यभागी महावितरणाचा सिमेंटचा पोल आहे तो रहदारीसाठी अडथळा ठरत आहे. या रस्त्यावरच सार्वजनिक पाण्याचा हातपंप असून येणाऱ्या जाणाऱ्याची वर्दळ खूप मोठ्या प्रमाणावर असते तसेच हा सिमेंटचा पोल रस्त्याच्या मध्यभागी असल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनासाठी अडथळा ठरत आहे.
संभाव्य धोका लक्षात घेता हा सिमेंटचा पोल काढण्यात यावा असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment