मध्यान भोजन वेळेवर मिळत नसून आयुक्तालयाचे अक्षम्य दुर्लक्ष,बांधकाम कामगाराला ठेकेदाराची मनमानी कारभार ...! - latursaptrangnews

Breaking

Monday, May 1, 2023

मध्यान भोजन वेळेवर मिळत नसून आयुक्तालयाचे अक्षम्य दुर्लक्ष,बांधकाम कामगाराला ठेकेदाराची मनमानी कारभार ...!

 मध्यान भोजन वेळेवर मिळत नसून आयुक्तालयाचे अक्षम्य दुर्लक्ष,बांधकाम कामगाराला ठेकेदाराची मनमानी कारभार ...!



अटल मध्यान्ह भोजन योजनेच्या गैरव्यवहाराची चौकशी करा : भिम क्रांती संघ


मुरुड प्रतिनिधी(श्रीकांत टिळक) : - लातूर जिल्ह्यातील कामगारांना दिल्या जाणाऱ्या अटल मध्यान्ह भोजन योजनेच्या गैरव्यवहाराची समिती गठ्ठीत करून सखोल चौकशी करण्यासंदर्भात भिम क्रांती संघाचे संस्थापक अध्यक्ष जयदीप सुरवसे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.


दिलेल्या निवेदनात विस्तृत असे म्हटले आहे की, जिल्ह्यात नोंदणीकृत कामगारांना दिल्या जाणाऱ्या अटल  मध्यान्ह भोजन योजनेची चौकशी करणे आवश्यक असून सदरील योजनेत खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे जसे की, मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या जेवणाची नियमित तपासणी न होता कामगारांना भोजन वाटप केले जाते, जेवणामध्ये डाळ, भात, गुळ, मिरची, लोणचे देत असून यामध्ये चपाती, आणि भाजी देत नसल्याचे आढळून आले आहे, तसेच हे भोजन खूप कमी प्रमाणात दिले जात आहे. 


कामगारांना आठवड्यातून एक दिवस सुट्टी असते त्या दिवशीचे जेवण त्यांना दिले जात नाही याची शासन दरबारी नोंद घेतली जाते का ? तसेच या कामगारांना वेळेवर जेवण दिले जात नाही. जिल्ह्यातील जे लोक कामगारही नाहीत अशाना ही भोजन दिले जात आहे, बऱ्याच ठिकाणी नोंदणीकृत कामगारांना भोजन दिले जात नाही जिल्ह्यातील वीट भट्टी कामगारांची संख्या खूप असून बऱ्याच कामगारांना भोजनापासून वंचित ठेवण्याचे काम या योजनेअंतर्गत होताना दिसून येत आहे. इंवर्ड केलेल्या कामगार यादींना भोजनाचा लाभ दोन, दोन महिने दिला जात नाही भोजनाचे वितरण करणारे कर्मचारी कामगारांना उद्धटपणे बोलतात तसेच हे भोजन बंद करू अशी दमदाटी कामगारांना देतात मध्यान भोजन योजनेची सर्व कर्मचारी मनमानी कारभार करत असून बोगस बिले ही उचलत आहे.


 सदरील नोंदणीकृत व अनोंदणीकृत कामगार यादी मधील सर्व कामगारांची नावे व मोबाईल नंबर तसेच ठेकेदार, वीट भट्टी मालकांची चौकशी करण्यात यावी. शासकीय कर्मचारी या योजनेची स्थळ पाहणी प्रत्यक्ष जाऊन करतात का ? सरास या योजनेत नोंदणीकृत कामगारांना जेवण देता अनधिकृत कामगारांना जेवण दिले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. सध्याचे जेवण पुरवठा करत असलेली संस्था कार्यक्षम कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर करताना मात्र दिसून येत आहे. या निवेदनाची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन तालुका निहाय समिती गठित करून सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी. तसेच या निवेदनाच्या माहितीस्तव प्रती आमदार रमेश आप्पा कराड, खासदार सुधाकर श्रृंगारे, आदींना देण्यात आले आहेत.




No comments:

Post a Comment