दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत कामे करा :- भिम क्रांती संघ





 दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत कामे करा :- भिम क्रांती संघ 

                                               "नालंदा बुद्ध विहाराची इमारतीला गेले तडे "

                                                    मुरुड प्रतिनिधी (श्रीकांत टिळक):- नालंदा बुद्ध विहाराची इमारतीला तडे गेले असून केव्हाही इमारत ढासळू शकते,दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत कामे करण्यासंदर्भात भिम क्रांती संघाचे संस्थापक अध्यक्ष जयदीप सुरवसे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.


दिलेल्या निवेदनात विस्तृत असे म्हटले आहे की, मुरुड मध्ये दलित वस्ती खूप मोठ्या प्रमाणात असून येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत कामे होणे आवश्यक आहे जसे की,दत्तनगर संभाजी चौक ते क्रीडा संकुल रस्ता, आंबेडकर नगर मधील नालंदा बोध विहार ते अण्णाभाऊ साठे चौक रस्ता, भीम नगर ते समशान भूमी दरम्यान असलेला रस्ता येथे सिमेंट काँक्रीटचे रस्ते होणे आवश्यक आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची अर्धवट राहिलेली संरक्षण  भिंत व प्लेवर ब्लॉक बसवणे आवश्यक आहे. नालंदा बुद्ध विहाराची इमारत जीर्ण झाली असून तेथे नवीन इमारत बांधणे आवश्यक आहे तसेच मुरुड मध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या जास्त असून येथे ४० लाख रुपयाचे संविधान सभागृह होणे गरजेचे आहे. असे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.


 मोजे मुरुड तालुका जिल्हा लातूर येथील दलित वस्ती खूप मोठ्या प्रमाणात असून या वस्तीमध्ये सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करणे आवश्यक आहे जसे की दत्तनगर संभाजी चौक ते क्रीडा संकुल, रमाई आंबेडकर नगर मधील नालंदा बोध विहार ते अण्णाभाऊ साठे चौक, भीम नगर ते समशान भूमी यादरम्यान असलेले रस्ते झालेला असून  येथे सर्वात जास्त दलित लोक रहातात. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सिमेंट काँक्रीटचे रस्ता तयार करणे आवश्यक आहे.

 या निवेदनाची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन वरील उल्लेख  केलेल्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्यासंदर्भात संबंधित विभागाला आदेशित करावे , भिम क्रांती संघाचा वतीने मागणी करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post