मुरूड(श्रीकांत टिळक) :- मुरुड शहरातील देशमुख नगर भागातील काही वर्षांपासून तेथील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे ही बाब लक्षात घेऊन मुरुड ग्रामपंचायत च्या वतीने बोरवेल घेऊन तेथील नागरिकांची पाण्याची समस्या सोडविली आहे. तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे सात वर्षां पुर्वी बोअर घेण्यात आले होते पण अद्याप पर्यंत मोटार न सोडल्या मुळे बंद आवस्थेत होते मुरुड ग्रामपंचायत च्या वतीने बंद बोरवेल चे रिबोअर करुन त्या मध्ये नवीन मोटार सोडुन पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला. या प्रसंगी सरपंच श्रीमती अमृताताई अमर नाडे व उपसरपंच हणुमंत बापू नागटिळक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून जल पुजन करण्यात आले. पाण्याची समस्या सुटल्या मुळे दोन्ही ठिकाण च्या नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी श्री.रविंद्र आबा नाडे, ग्रामपंचायत सदस्य श्री.महेश कणसे, श्री.राजेंद्र गाडे, श्री.मेघराज अंधारे, सौ.श्रुती सवाई , सौ.अंजु शिंदे व मुरुड ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी, स्थानिक रहिवासी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Tags
लातूर