व्यवसायिकांनी स्वतः अतिक्रमणे काढून घेण्याचे मनपाचे आवाहन



 व्यवसायिकांनी स्वतः अतिक्रमणे काढून घेण्याचे मनपाचे आवाहन

 

लातूर/प्रतिनिधी:शहरातील गंजगोलाई परिसर व या भागाकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यास महानगरपालिकेने सुरुवात केली आहे.व्यवसायिकांनी आपापली अतिक्रमणे स्वतः काढून घ्यावीतअसे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.

    गंजगोलाई व त्या परिसरातील सर्व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेली आहेत.यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.याचिका क्रमांक ९६६९/२०१७ व ११५७२/२०१७ या दोन्ही याचिकांवर न्यायालयाने सुनावणी घेतली.ही अतिक्रमणे चार आठवड्यांच्या आत काढून टाकण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दि.३ मे २०२३ रोजी दिले आहेत.अतिक्रमणे चार आठवड्याच्या आत काढून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिलेले आहेत.त्यानुसार गुरुवार दि.४ मे रोजी मनपाकडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे.ज्या व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमणे केली आहेत त्यांनी आपली अतिक्रमणे स्वतः काढून घ्यावीत.मनपाकडून अतिक्रमणे काढण्यात आली तर व्यावसायिकांचे साहित्य परत दिले जाणार नाही.नुकसान टाळण्यासाठी व्यवसायिकांनी स्वतःच आपली अतिक्रमणे काढून घेऊनमहानगरपालिकेला व जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post