या वेळी अमित शहा म्हणाले, की ‘माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकसाठी खूप मोठे काम करून ठेवले आहे. भाजपने मुस्लिमांचे चार टक्के आरक्षण संपुष्टात आणले; तर वोक्कलिंग, लिंगायत, एससी, एसटींचा कोटा वाढवला. जर काँग्रेस सत्तेत आली तर ते हा कोटा कमी करतील आणि मुस्लिमांचे चार टक्के आरक्षण पुन्हा लागू करतील.’
मुस्लिमांचे आरक्षण पुन्हा लागू केलेले चालणार का?
तुम्हाला मुस्लिमांचे आरक्षण पुन्हा लागू केलेले चालणार आहे का? असा प्रश्नही शहा त्यांनी विचारला. कर्नाटकमध्ये डबल इंजिनचे सरकार निवडून द्या, असे आवाहनही शहा यांनी केले. जर कर्नाटकमध्ये भाजप निवडून आला, तर मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होतील, असेही शहा यांनी सांगितले. दरम्यान, तुमकूर येथील खासदार जी. एस. बसवराज हेही शहा यांच्यासोबत या रोड शोमध्ये सामील झाले होते.