घरबसल्या आधार कार्ड 'फ्री' मध्ये करा अपडेट, १५ जून २०२३ पर्यंत संधी, त्यानंतर मोजावे लागणार पैसे
तर UIDAI वेबसाइटनुसार, आधार वापरकर्ते १५ जून २०२३ पूर्वी आधार घरबसल्या मोफतपणे अपडेट करू शकतात. पण १५ जून नंतर मात्र कोणत्याही प्रकारची माहिती अपडेट करण्यासाठी लोकांकडून पैसे आकारले जाणार आहेत. मात्र, शुल्क किती असेल याबाबत अधिकृत माहिती नाही. सेवेनुसार अपडेट फी ठरवली जाईल.
ऑफलाइन अपडेटसाठी 50 रुपये

तर नेमकी अधिकृत किंमत समोर आली नसली तरी समोर येणाऱ्या माहितीनुसार आधार ऑफलाइन अपडेट करण्यासाठी अर्थात सेवा केंद्रातून अपडेट करायला ५० रुपये फी भरावी लागेल. त्याच वेळी, १५ जूनपूर्वी ऑनलाइन अपडेट करण्यासाठी लोकांकडून कोणतेही शुल्क वसूल केले जाणार नाही.
घरसबल्या अपडेट करण्यासाठी काय कराल?

सर्व प्रथम UIDAI च्या वेबसाइटवर जा. आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरने लॉग इन करा. आता तुम्हाला जे काही तपशील अपडेट करायचे आहेत. त्या सेवेवर क्लिक करा
यानंतर तुमची माहिती भरा. तुमच्या माहितीची पडताळणी करण्यासाठी सहाय्यक कागदपत्रे जोडा. आता काही दिवसांनी तुमची माहिती ऑनलाइन अपडेट होईल.
आधार कार्ड अपडेट करताना हे नक्की लक्षात ठेवा

आधार कार्डमध्ये जे काही बदल केले जात आहेत, ते पुन्हा एकदा पडताळा कारण नंतर पुन्हा तुम्हाला त्रास होू नये यासाठी हे महत्त्वाचे आहे. वैयक्तिकरित्या केले जाणारे बदल योग्य असले पाहिजेत आणि व्यक्तीच्या फॉर्ममध्ये योग्य कागदपत्रे जोडलेली असणे आवश्यक आहे. आवश्यक माहिती इंग्रजी किंवा स्थानिक भाषेत प्रविष्ट करावी
आधार कार्ड माहिती दुरुस्त करताना, हे सुनिश्चित केले पाहिजे की URN सुरक्षित आहे कारण ते कार्डच्या अद्यतनाची स्थिती तपासण्यास मदत करेल.जर कार्डधारकाकडे नोंदणीकृत फोन नंबर नसेल, तर आधार कार्ड दुरुस्त करण्याची ऑफलाइन पद्धत अवलंबावी.
नाव बदलताना लागणारी काही महत्त्वाची कागपमंत्र

नाव बदलताना तशा बऱ्याच गोष्टी लागतात. अनेकदा चूकीचं प्रिंट झालेलं नाव बदलावं लागतं. काही जण लग्नानंतरही नाव बदलतात. पण ही प्रोसेस करतान इतरही महत्त्वाचे डॉक्योमेंट लागतात. यामध्ये खासकरुन पासपोर्ट, पॅन कार्ड, राशन कार्ड, वोटर आईडी या साऱ्या गरजेच्या गोष्टी आहेत.
आधार फोटो कॉपी शेअर करतान घ्या काळजी

आधारची फोटोकॉपी शेअर करताना सतर्क राहून काळजी घेणं महत्त्वातचं आहे. तुम्ही आधार कार्ड कोणाला देत आहात ते लक्षात ठेवा. तसेच, फोटोकॉपी देत असताना त्यावर ज्या कामासाठी देत आहोत, त्याची माहिती नक्की लिहा. अनेकजण सरकारी योजना अथवा सबसीडीच्या नावाखाली मूळ आधार कार्ड देतात. मात्र, कधीही तुमचे मूळ आधार कार्ड इतरांना देऊ नये. गरज असल्यावर तुम्ही फोटोकॉपी देऊ शकता.