डॉक्टरच्या मुलाचं बारसं, हॉटेलवरून पडून मुलीचा मृत्यू, लातूर शहरात एकच खळबळ - latursaptrangnews

Breaking

Wednesday, June 14, 2023

डॉक्टरच्या मुलाचं बारसं, हॉटेलवरून पडून मुलीचा मृत्यू, लातूर शहरात एकच खळबळ



डॉक्टरच्या मुलाचं बारसं, हॉटेलवरून पडून मुलीचा मृत्यू, लातूर शहरात एकच खळबळ


लातूर : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजी नगर पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या अंजली हॉटेलवरून एक मुलगी पडली. या घटनेत तिचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच शिवजी नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. डॉ. कुलकर्णी यांच्या मुलाच्या बारशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी अनेक नातेवाईक आले होते. ही मुलगीही या कार्यक्रमासाठी आली होती, अशी प्रथमिक माहिती समोर आली आहे.


पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह स्व. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदसाठी पाठवला. या मुलीने आत्महत्या केली की हत्या? हॉटेलमधे नेमके काय झाले? तिच्या सोबत कोण होते? ती मुलगी कोण आहे? याचा अधिक तपास शिवाजी नगर पोलीस करत आहेत. मुलगी हॉटेलच्या खिडकीत बसली होती काचेला टेकून. यावेळी अचानक काच निघाला आणि ती पडली. हॉटेलच्या बाजूनेच विजेच्या तारा जातात. त्यावर ती आधी पडली आणि मग खाली कोसळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


नातेवाईकांनी अगोदर आधी मुलीला (सह्याद्री हॉस्पिटल) खासगी रुग्णालयात नेले होते. पण डॉक्टरांनी मृत घोषित केल्याने स्व. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनसाठी नेले. मुलीचे आई वडील हैदराबादवरून निघाले आहेत. अजून पोहचले नाहीत. मृत मुलीचे वय १३ वर्ष असल्याचं सांगण्यात येत आहे.


काही दिवसांपूर्वी हॉटेल ग्रँडमधे एका तरुण कापड व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मात्र नातेवाईकांनी घातपाताची संशय व्यक्त केला होता. त्यामुळे लातूर शहरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता या घटनेनं लातूर हादरले आहे.

No comments:

Post a Comment