आ रमेशआप्पा कराड निवाडा ग्रामस्था समवेत मन की बात कार्यक्रमात सहभागी
देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा आज रविवार दि. 18 जून 2023 रोजीचा मन की बात हा कार्यक्रम भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत रेणापूर तालुक्यातील मौजे निवाडा येथे झाला. यावेळी भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह निवाडा येथील महिला पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जगातील लोकप्रिय नेते देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब हे दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधतात या महिन्यातील हा कार्यक्रम परदेश दौऱ्यामुळे एक आठवडा अगोदर 18 जून रोजी झाला. या कार्यक्रमाचे रेणापूर तालुक्यातील मौजे निवाडा येथील भाजपाच्या वतीने संगमेश्वर मंदिर सभागृहात आयोजन करण्यात आले होते.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांनी निवाडा येथील कार्यक्रमात आवर्जून सहभागी झाले आणि मोदीजींचा संपूर्ण संवाद ऐकला. आजच्या कार्यक्रमात भारताच्या इतिहासात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य गौरवशाली असून भविष्यासाठी प्रेरणा देणारे आहे असे सांगून जलसंवर्धन, जागतिक योग दिन, जगन्नाथ पुरी येथील रथयात्रा, जम्मू कश्मीर राज्यात बारामुल्ला जिल्ह्यातील लाखो लिटर दूध उत्पादन, गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील वादळी वाऱ्याचे नुकसान, विविध क्रीडा स्पर्धेतील जागतिक स्तरावर मिळालेले यश या सर्व विषयावर पंतप्रधान नरेंद्र जी मोदी साहेब यांनी सविस्तर भाष्य करून देशभरातील जनतेला माहिती दिली.
निवाडा येथील मन की बात या कार्यक्रमात आ रमेशआप्पा कराड यांच्या समवेत प्रदेश भाजपाचे सदस्य अनिल भिसे, भागवत सोट, तालुका अध्यक्ष अँड दशरथ सरवदे, सांगायो समितीचे अध्यक्ष वसंत करमोडे, शरद दरेकर, भागवत गीते, श्रीकृष्ण पवार, अनुसया फड, शिला आचार्य, चंद्रकांत कातळे, उत्तम चव्हाण, गोपाळ शेंडगे, अजित गायकवाड, लक्ष्मण खलग्रे श्रीमंत नागरगोजे यांच्यासह निवाडा येथील सरपंच वंदना साळुंके, चेअरमन दिलीप उरगुंडे, शिवमूर्तीआप्पा उरगुंडे, महादेव कुंडुळे, संगमेश्वर स्वामी, नंदकुमार साळुंखे पृथ्वीराज उरगुडे, विठ्ठल कस्पटे, मेघराज बडे, दिलीप घोडके, गफूर शेख सदाशिव बनसोडे यांच्यासह गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
No comments:
Post a Comment