कोल्हापूरची दंगल घडली की घडवली? पोलिसांच्या भूमिकेवर संशय

 


कोल्हापूरची दंगल घडली की घडवली? पोलिसांच्या भूमिकेवर संशय


कोल्हापूर : एखादी दंगल झाल्यानंतर सर्वात जास्त सर्वसामान्य नागरिकाचं घर आणि दुकान जळत असतं. कोल्हापूरमध्ये घडलेल्या दंगलीकडे पाहता घटनास्थळी पोलीस उशिरा पोहोचणे, योग्य बंदोबस्त न ठेवणे आणि समाजात वाद निर्माण कसा होईल याचा प्रयत्न होत आहे. म्हणून ही दंगल घडली का घडवली गेली? हे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शंका व्यक्त केली आहे. कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
कोल्हापूरची दंगल घडली की घडवली?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज वर्धापन दिन असल्याने आमदार रोहित पवार यांनी आज कोल्हापुरात येऊन छत्रपती राजश्री शाहू महाराज स्मृती समाधीस्थळी येऊन त्यांना अभिवादन केलं. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोल्हापूरमध्ये घडलेल्या दंगलीबाबत यावेळी त्यांना पत्रकारांनी विचारलं. प्रतिक्रिया देत रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

दोन धर्मात धार्मिक मुद्द्यावर सोशल मीडियाचा आधार घेऊन धर्मांध शक्तींनी कोल्हापुरातील सामाजिक सलोख्याचं वातावरण बिघडवलं. दंगल झाल्यानंतर सामान्य नागरिकांच घर आणि दुकान जळल्यानं कुटुंब उद्ध्वस्त होत असतं. दंगल होत असताना एसपी आणि सर्व अधिकारी उशिरा आले आणि दंगल होत असताना शासनाच्या गाड्या इथं नसणं या सर्व गोष्टी पाहिल्या असता शासनाकडून काहीतरी चुकत आहे, असं वाटत आहे. त्या ठिकाणी योग्य बंदोबस्त ठेवला गेला नाही. समाजात वाद निर्माण कसा राहील याचा प्रयत्न केला जात आहे आणि यामुळे ही दंगल घडली का घडवली? हे पाहावं लागेल असं म्हणत रोहित पवार यांनी शंका व्यक्त केली.

'भाजप नेहमी संविधान विरोधी वागला'

भाजप हा संविधानाच्या विरोधात कार्यकर्त्यांना भडकवत आहे का हे पाहावं लागेल भाजप नेहमी संविधान विरोधी वागला आहे. यापूर्वीही भाजपने देशभरातील अनेक ठिकाणी धार्मिक मुद्द्यावर वातावरण तापवून निवडणुका आपल्या खिशात घातल्याच्या घटना समोर आहेत. कर्नाटकात जनतेने जशी जागा दाखवली तशी जागा महाराष्ट्रातील जनता करेल. भाजपने इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला आहे. चुकीच्या पद्धतीने बोलणाऱ्यांना प्रोत्साहन दिलं जातं. चुकीचा वागला तरी कार्यकर्त्याची बाजू भाजप घेतो. यामुळे देशासह राज्यात धार्मिक उन्माद वाढत आहे, असं रोहित पवार म्हणाले.

मुख्यमंत्री यांच्या शासन आपल्या दारी या उपक्रमावर त्यांनी निशाणा साधला. त्यांचा हा उपक्रम म्हणजे सरकारी इव्हेंट आहे. या उपक्रमासाठी शासकीय कर्मचाऱ्यांवर जबाबदारी दिली आहे. लोक आपल्या सोबत असल्याचं दाखवण्याचा हा प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमातून शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रकार सरकार करत आहे, असा टीका रोहित पवारांनी केली.


'चित्रा वाघ आता एका मंत्र्याबद्दल बोलायच्या बंद झाल्या'

तर सध्या भाजच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये जोरदार वाद रंगला आहे. अगदी खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांवर टीका केली जात आहे. मात्र चित्रा वाघ या महाविकास आघाडी सरकार असताना आणि आता देखील मंत्री असलेल्या नेत्यावर त्या बोलत नाहीत. त्यांच्या सोयीप्रमाणे चित्रा वाघ बोलत असतात. त्यांच्याकडे नवे मुद्दे नाहीत. महाविकास आघाडीचे सरकार असताना महिलांच्या मुद्द्यावर आक्रमक होणाऱ्या चित्रा वाघ आता महिलांवर अत्याचार होत असताना गप्प का? असा सवाल रोहित पवारांनी यावेळी उपस्थित केला.

'शरद पवारांवर बोलणं बंद करा अन्यथा...'

स्वतःचं पद जपण्यासाठी काही नेते खालच्या पातळीला जाऊन बोलत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य केली जात आहेत. भाजपचे काही वरिष्ठ नेते अशा वक्तव्यांना पाठबळ देत आहे. शरद पवारांवर बोलणं बंद करा अन्यथा तुमची झोप कशी उडेल हे आम्ही सर्वजण बघू, असा इशारा रोहित पवारांनी दिला.

Post a Comment

Previous Post Next Post