दगडाने ठेचलं, जीव गेला नाही म्हणून दुसरीकडे नेत कायमचं संपवलं
धाराशीव : संशय माणसाला कुठल्याही स्तरापर्यंत घेवून जातो. याच संशयामुळे कित्येकाचे मुडदे पडले. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. प्रेम प्रकरणातून आणि संशयातून गुन्हे होण्याच्या अनेक घटना आपण आतापर्यंत पाहिल्या असतील. असाच एक भयंकर प्रकार उस्मानाबादमध्ये समोर आला आहे. इथे केवळ संशयातून कळंब तालुक्यातील शिराढोण पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या माळकरंजा येथील ४५ वर्षीय व्यक्तीचा खून झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कळंब तालुक्यातील माळकरंजा येथील आशाबाई महादेव काळे यांचे पती महादेव हिरा काळे, वय ४५ वर्षे, हे दि. ८ मे रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घरी असताना विकास बब्रु काळे, सुरज पवार, गंगाराम पवार, बबलु पवार, खाज्या पवार आणि रवि काळे मुलगा या सर्वांनी या आधी तू पोलीसांना आम्हाला का पकडून दिले या कारणावरून महादेव यांना त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करून दगडाने, मारहाण केली.
इतक्यावरच हे थांबले नाहीत तर स्कॉरपिओ गाडीमध्ये घालून जिवे मारण्याच्या उद्देशाने घेवून गेले. यानंतर त्यांना जिवंत ठार करून मंगरुळ पाटी इथं मयत महादेव हिरा काळे यांना आणून फेकले. मयत महादेव काळे यांच्या पत्नी आशाबाई काळे यांनी ९ मे रोजी दिलेल्या तक्रारीवरून भारतीय दंड संहिता कलम- ३०२, ३५४, ३२४, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४७, १४८, १४९ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक कल्याण नेरकर हे करत असून आरोपी फरार असल्याची माहिती आहे. तर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
Tags
महाराष्ट्र.