फेसबुकवर औरंगजेबाच्या फोटोची पोस्ट, आष्टीमध्ये तणाव शहर बंदची हाक
बीड: आष्टी येथील युवकाने फेसबुक वर औरंगजेबाचा फोटो पोस्ट केल्याने गुरुवारी रात्री तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर आज शुक्रवारी आष्टी शहर बंदची हाक हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून ठीकठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुण पिढी एका जागेवर बसून विनाकारण काहीही करते. मात्र, त्याचा परिणाम कोणाला भोगावे लागेल याचा अंदाज त्यांना नसतो. आज हिंदू असं किंवा मुस्लिम असेल मोठ्या एक्याने राहत आहेत. मात्र ही तरुण मुलं व्हाट्सअप इंटरनेटच्या माध्यमातून काहीतरी पोस्ट करतात आणि त्याचा फटका हा नागरिकांना बसतो, असं सांगत आष्टीतील नागरिकांनी या युवकांवर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, असल्या घटनेने सामान्य नागरिकांचे नुकसान होत आहे. समाजात तेढ निर्माण होते विनाकारण केलेल्या पोस्ट या करणाऱ्या तरुणांना याचा फटका जाणवत नाही. विनाकारण मनात भरवलेल्या भावना व्यक्त करताना या तरुणाईने भान देखील ठेवणे गरजेचे असल्याचे येथील नागरिकांनी म्हटले.
तीन दिवसाच्या तणावानंतर कोल्हापूर पुन्हा पूर्वपदावर, पण इंटरनेट सेवा बंद राहिल्याने व्यापाराला फटका
तीन दिवसाच्या तणावपूर्ण वातावरणानंतर आज कोल्हापूर कोल्हापूर व पदावर आलेला आहे. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरातील सर्व बाजारपेठ पुन्हा पहिल्याप्रमाणे सुरू झाल्या आहेत. तणावपूर्ण वातावरण कुठेतरी आता निवळल्याचे दिसून येत आहे. मात्र, अद्यापही इंटरनेट सेवा बंद असल्याने व्यापारावर परिणाम होत आहे. गेल्या तीन दिवसांत इंटरनेट बंद असल्याने मोबाइल आणि इंटरनेटद्वारे होणारे कोटय़वधी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले होते. बँका, औद्योगिक-व्यापारी संस्था, शैक्षणिक संस्थांना फटका बसला. अनेकांनी तातडीच्या ‘ई – बँकिंग’ व्यवहारांसाठी सीमेलगतच्या कर्नाटकातील गावांसह सांगली जिल्ह्यात जाण्याचा पयार्य निवडला होता.
Tags
महाराष्ट्र