नुतन न्यायाधीशांचा सत्कार संपन्न
लातूर-लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीने नुतन न्यायाधीशांचा लातूर जिल्हा वकील मंडळाच्या कार्यालयात जिल्हा न्यायाधीश मा.एस.टी.त्रिपाठी , कौटुंबीक न्यायाधीश मा.सतेज पाटील,दिवाणी न्यायाधीश व स्तर मा.एस.एन.भोसले यांचा सत्कार करण्यात आला.या सत्कार सोहळयाच्या अध्यक्षस्थानी वकील मंडळाचे अध्यक्ष अॅड.महेश बामणकर प्रमुख उपस्थिती मा.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस.एम.कोसमकर, जिल्हा सरकारी वकील अॅड.संतोष देशपांडे ,वकील मंडळाचे सचिव अॅड.प्रदिपसिंह गंगणे आदीची उपस्थिीती होती.यावेळी नुतन न्यायाधीशांनी आपला परिचय देवुन आपले मनोगत व्यक्त केले तर अध्यक्ष व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांची समोयचित भाषणे झाली. या सत्कार सोहळयाच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वकील मंडळाचे सहसचिव अॅड.गोपाळ बुरबुरे यांनी केले तर आभार ग्रंथालय सचिव अॅड.संतोष सोनी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी उपाध्यक्ष अॅड.गजानन चाकुरकर,कोषाध्यक्ष अॅड.अमोल पोतदार,अॅड.मंगेश राठोड,अॅड.कैलास मस्के,अॅड.उदय दाभाडे,अॅड.सलीम डावकरे,अॅड.मेधा पाटणकर अॅड.यंशवतराव चव्हाण तसेच कार्यालयीन कर्मचारी सुशिल सुर्यवंशी,प्रकाश मसलगे,विष्णु जाधव यांनी परिश्रम घेतले. या सत्कार सोहळयास मोठया प्रमाणात विधीज्ञ उपस्थित होते.
Tags
लातूर