Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    मुरुड मध्ये दारू,गुटखा, मटका जोमात पोलीस प्रशासन कोमात !




     मुरुड मध्ये दारू,गुटखा, मटका जोमात पोलीस प्रशासन कोमात !


    "दारू, गुटका ,मटका बंद करण्यासंदर्भात बाळासाहेबाची शिवसेना शहर प्रमुख अंकुश कुंभार यांची मागणी"


    मुरुड प्रतिनिधी :- मुरुड परिसरात अवैध प्रकारे चालू असणारे दारू, मटका व गुटखा विक्री जोमात चालू असून पोलीस प्रशासन मात्र कोमात असल्याचे चित्र मुरुड मध्ये दिसून येत आहे. हे धंदे बंद करण्यासंदर्भात मुरुड पोलीस स्टेशन यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.


    दिलेल्या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की,दारू, गुटका ,मटका बंद करण्यासंदर्भात बाळासाहेबाची शिवसेना शहर प्रमुख अंकुश कुंभार यांची मागणी केली आहे .तसेच मुरुड हे गाव लातूर-बार्शी राज्य महामार्गावर आहे. मुरुड या गावामध्ये नवाजलेल्या शिक्षण संस्था आहेत. या शिक्षणसंस्थे मध्ये ३० ते ३५ गावातील विद्यार्थी विद्यार्थीनी शिक्षणासाठी येत आहेत. तसेच मुरुड येथील बाजारपेठे मध्ये ,दत्त नगर , रेल्वे स्टेशन या ठिकाणी देशी, विदेशी व हटभट्टी व दारु विक्रीचे प्रमाण जास्त असल्या कारणाने मुरुड मधील बऱ्याच लोकांचे संसार उध्दस्त झालेले आहेत.

    तसेच मुरुड येथील बसस्थानक परिसरात असलेल्या विद्यालय असून हद्दीमध्ये पानटपरीचे प्रमाण वाढले आहे. या पानटपरी मध्ये गुटखा जास्त प्रमाणात विकला जातो.यामुळे या गोष्टींचा विद्यार्थ्यांवर दुष्परीणाम होत आहे. व विद्यार्थी व्यसनाधिन होत आहे.

    यानंतर मुरुड मध्ये ३० ते ४० ठिकाणी मटक्या प्रमाण व मटक्याची दुकाने गल्ली बोळीत थाटलेली आहेत.

    "दारू, गुटका ,मटका तातडीने बंद करण्यात यावा अन्यथा आम्हाला लोकशाही पध्दतीने आंदोलनाचा अवलंब करावा लागेल. आपल्या स्तरावरुन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.यावेळी शिवसेना शहर प्रमुख व अधिकारी,कार्यकर्ते , महिला नागरिक उपस्थित होते.





    https://myshopprime.com/aman.online/wcm0nde

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad