सीए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्यार्थ्यांचा सत्कार
आज दिनांक 10 जुलै 2023 रोजी उच्च माध्यमिक विभागामध्ये सीए परीक्षा उत्तीर्ण झालेले आपल्या प्रशालेचे विद्यार्थी माननीय मोहित सुराना यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रशालेचे प्राचार्य आदरणीय मेश्राम सर,संस्थेचे अध्यक्ष माननीय अंकित नाडे सर तसेच दीपक पाटील साहेब ,संचालक धनंजय नाडे सर ,मुंडे सर ,एन .एस. जाधव सर व मोहित सुराणा सर यांचे संपूर्ण कुटुंबीय तसेच त्यांना ज्यांनी घडवलं असे त्यांचे काका देखील यावेळी मंचावरती उपस्थित होते. यावेळी जनता उच्च माध्यमिक विभागाचे प्राचार्य मेश्राम सर यांनी व कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती मोहित सुराणा यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शहाजी काटे सर यांनी केले. तसेच या कार्यक्रमाचे संपूर्ण फोटोग्राफी मीरकले सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रकटन श्री खडके सर यांनी केले
No comments