Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    महाराष्ट्राच्या राजकारणाचा पाया...आज हरवला आहे? ..

     महाराष्ट्राच्या राजकारणाचा पाया...

          आज हरवला आहे? ..






    महानुभाव संप्रदायात दृष्टांतपाठात एक दृष्टांत आहे. सिंदेराणियांचा दृष्टांत.

     या दृष्टांतात एक शिंदे सरदार एका राजांच्या दरबारी महत्त्वाचे सरदार असतात.पण राजकीय संघर्षात त्या राजाची सत्ता दुसरा राजा आक्रमण करून हाशिल करतो. राजाचा पराभव झाला म्हणून शिंदे सरदार सरळ गावाकडे येऊन शेती करत असतात,तर बाकीचे काही सरदार दुसऱ्या राजाकडे सरदार होतात,काही नव्याने सत्तेवर आलेल्या राजाकडेच सरदारकी स्वीकारतात पण शिंदे सरदार एकनिष्ठ सरदार असल्याने ते गावाकडील शेती करण्याचा निर्णय घेतात. 

        परंतू काही काळानंतर ज्या राजाची सत्ता दुसऱ्या राजाने हाशिल केली होती ती सत्ता पहिला राजा स्वसामर्थ्याने मिळवतो.राजा पुन्हा सत्तेवर येतो.सत्तेवर येतात त्या राजाच्या सोबत असलेले सर्व सरदार त्यांना येऊन मिळतात. परंतु या सरदारात शिंदे सरदार मात्र नसतात. तेव्हा तो राजा म्हणतो की शिंदे सरदार दिसत नाहीयेत, तेव्हा सर्व सरदार राजांना माहिती पुरवितात के ते आपल्या गावाकडे शेती करतात. त्यांनी आमच्या प्रमाणे इतर राजाकडे सरदारकी केली नाही.त्यावेळी राजाला लक्षात आले की या सर्व सरदारा पैकी शिंदे सरदार निष्ठावान आहेत.एकनिष्ठ आहेत.म्हणून हा राजा शिंदे सरदारांना घेऊन येण्यासाठी अंबारी पाठवितो.आणि शिंदे सरदारांच्या स्वागतासाठी राजधानीच्या वेशीपर्यंत जातो.


    एकनिष्ठता काय असते,ती समाजात कशी रूजते,समाज तिचा कधी स्वीकार करतो.समाजात मूल्यांची पेरणी कशी करावी इमान काय असते....

    अशा असंख्य बाबी आज समाजात का दिसत नाहीत. समाज बिघडला, समाजात अविश्वास निर्माण झाला.समाज स्वार्थी आहे.समाज भाऊ-भाऊ,भाऊ- बहीण,बाप-मुलगा संगे-सोयरे, मित्र-मित्र या सर्वांमध्ये दरी का निर्माण झाली.ती दरी, स्वार्थ कोणी निर्माण केला.समाजात नैतिकता, मूल्यांची पायमल्ली कोणी केली.... याला जबाबदार समाज आहे.राजकारण आहे, राज्यकर्ते आहेत.

      राजकारणात कुणाचा पायपोस कुणाच्या पायात आहे का? सगळ्यांची एकच धामधूम आहे सत्ता मिळवणे सत्ता मिळवता पुढे काय?   

    हे सरकार गरिबांचं आहे, सामान्य माणसांच्या न्यायासाठी आहे, सामान्य माणसांच्या हक्कासाठी आहे, तळागाळातल्या लोकांसाठी आहे, गरिबी दूर करण्यासाठी आहे.अशा घोषणा मी माझ्या कळत्या वयापासून ऐकतो आहे.पण काही फरक पडला?..

      निवडणुका जवळ आल्या की मतदार दिसतात. नागरिक दिसतात.आम्ही डिझेल, पेट्रोल स्वस्त करू, पंधरा लाख देवू,शिक्षण, आरोग्याच्या सुविधा देवू, या जातीला आरक्षण देवू,त्या जातीला ओबीसी,एस.टी प्रवर्गात घालू, शेतकऱ्यांना न्याय देऊ, स्वामीनाथन आयोग लागू करू..... अशा असंख्य घोषणांचा पाऊस पडतो. जातीच्या, धर्माच्या नावाने घोषणा देण्यात येतात.

    पण सत्तेवर येताच लोककल्याणकारी योजनांचा गळा घोटला.धार्मिक जातीय मुद्दे टोकदार करून समाजाला मुळ प्रश्नापासून दूर ठेवले जाते.

      निवडून आलेले आमदार-खासदार कोण कुणासोबत आहेत.कोणत्या पक्षात आहेत.कधी पक्ष सोडतील, कधी बंडखोरी करतील किंवा त्यांनी पक्ष सोडावा अशी परिस्थिती निर्माण केली जाते.

    हे सामान्य माणसाला काहीच कळत नाही का?तो गुमाण  सगळं पाहतेय.

      अशा सगळ्या विचित्र परिस्थितीत याच महाराष्ट्राच्या भूमीत तेराव्या शतकात एक निष्ठावान, निष्ठावंत सरदार होता.  पुढील राजकारणाची ती दिशा होती,हा आमच्या राजकारणाचा पाया आहे......

    आम्ही हे सगळं विसरलो आहोत......

     ..... जयद्रथ जाधव

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad