संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कुल, शिराळा येथे स्वतंत्रतादिवस उत्साहात साजरा
संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कुल, शिराळा येथे स्वतंत्रतादिवस उत्साहात साजरा
प्रतिनिधी:-( श्री नवनाथ शिंदे) दि. 15 ऑगष्ट 2023 वार मंगळवार रोजी संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कुल, शिराळा मध्ये स्वातंत्र्य दिनानिमीत्त ध्वजारोहन, राष्र्टगीत, राज्यगीत, मराठवाडा गीत, प्रभात फेरी घेऊन सर्व विद्यार्थ्यांचे भाषण घेण्यात आले. गतवर्षी 22-23 द्वितीय सत्र परीक्षेत, संत ज्ञानेश्वर टॅलेन्ट सर्च स्पर्धा परीक्षेतील, MIT SS Math स्पर्धा परीक्षेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणार्या तसेच स्काॅलरशीप पात्र सर्व विद्यार्थ्यांचा ट्राॅफी देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. तसेच मा.श्री. दादासाहेबजी पवार यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना आई-वडील यांच्या प्रेमाची व संस्काराची जाणीव ठेवण्याचे व सर्व पालकांना वेळ काढुन आपल्या पाल्यावर चांगले संस्कार करण्याचे, आपला पाल्य नियमीत काय करतो याकडे लक्ष देण्याचे मोलाचे मार्गदर्शन केले. ध्वजारोहन मा.श्री. अरविंदजी पारवे (उपसरपंच) व मा.श्री. क्षिरसाठ साहेब (ऑपरेटर) यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास मुख्य उपस्थिती दर्शवणारे मा.श्री. काकासाहेबजी कदम (अध्यक्ष), मा.श्री. दादासाहेबजी पवार (प्रमुख अतिथी), मा.श्री. मारुतीजी शिंदे (पालक प्रतिनिधी), मा.श्री. अमोलजी काळे (पालक), मा.श्री. नवनाथजी शिंदे युवा जिल्हा अध्यक्ष (स्वाभिमानी पक्ष शेतकरी संघटना - लातूर), इतर पालक वर्ग तसेच शालेय कर्मचारी आस्मा सय्यद, राधा मोरे, करिश्मा शेख, तस्लीम पठाण, प्रतीक्षा देशमुख, सुचीता काळे, धनंजय बर्डे, अशोक आतकरे, गोपाळ कदम, राजकन्या क्षिरसागर, संतोष भिसे, शंकर गरड, सौ. भाग्यश्री गोविंद देशमुख (प्रिन्सीपल), श्री. गोविंद ज्ञानोबा देशमुख (संस्था-सचीव), श्री. जितेंन्र्द रामराव मुटकुळे (संस्था- अध्यक्ष) यांच्या उपस्थितीत देशभक्तीपर अधारीत गीत घेऊन सौ. सिमा देशमुख यांनी सर्व उपस्थितीयांचे आभार मानुन अध्यक्षीय परवानगीने कार्यक्रम संपन्न करण्यात आला
No comments