मुरुड -लातूर -मुरुड जनता बस सुरू करा !
मुरुड -लातूर -मुरुड जनता बस सुरू करा !
"राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ग्राहक संरक्षण सेलचे हणमंत पाटील मागणी"
मुरुड प्रतिनिधी (श्रीकांत टिळक):- मुरुड - लातूर - मुरुड जनता बस वाहतूक चालू करण्याबाबत विभागीय नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ लातूर यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
दिलेल्या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की, मुरुड हे गाव सहा हजार लोकसंख्येची वस्तीचे असून येथे मोठ्या प्रमाणात बाजारपेठ,विविध क्षेत्रातील नोकर, नौकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्य करत आहेत तसेच मोठ्या प्रमाणात शिक्षण संस्था असून खेड्यापाड्यातून शिक्षणासाठी विद्यार्थी , विद्यार्थिनी नागरिक येणे जाणे करत असतात. बस हे एकमेव साधन असल्याने मुरुड येथे लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू आहेत पण त्या साठी मोजके एक ते दोन थांबे असल्यामुळे प्रवासी वाहतुकीचे साधने कमी असल्यामुळे अवैध्य प्रवासी वाहतूकीस आपल्यामुळेच अभय मिळाल्याची शंका नकारता येत नाही. यामुळे सर्वसामान्य प्रवासी महिला जेष्ठ नागरिकाचे अतोनात हाल होत आहे. तसेच प्रवाशांना आपल्या माध्यमातून योग्य व चांगल्या प्रकारची प्रवासी सुविधा उपलब्ध करण्याकरिता मुरुड लातूर मुरुड च्या एकूण चार गाड्या जनता गाडी सुरू करून सहकार्य करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष ग्राहक संरक्षण सेल लातूर हणमंत आप्पाराव पाटील यांनी मागणी केली आहे
No comments