Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    प्रगती लोकसंचलित साधन केंद्र मुरुड ची 12 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सपन्न



     प्रगती लोकसंचलित साधन केंद्र मुरुड ची 12 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सपन्न


    मुरुड प्रतिनिधी:- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) मार्गदर्शीत प्रगती लोकसंचालित साधन केंद्र मुरुड ची 12 वी वार्षिक सर्वसाधारण सभा माविम  जिल्हा समन्वय अधिकारी  पटेल सर यांच्या मार्गदर्शन खाली सपन्न झाली.

    दि. 29 रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेच आयोजन मुरुड येथील आदिनाथ मंगलकार्यालय येथे घेण्यात आली .

    तसेच सभेला बचत गटातील महिला उपस्थित होत्या सुरुवातीला महिलांची नोंदणी करण्यात आली त्यावेळी महिलांना हिंदुस्थान फीड कंपनी कडून एक वही पेन व मास्क वाटप करण्यात आलं नंतर ग्रामीण रुग्णालय मुरुड च्या वतीने महिलांची पेशाची व रक्तदाबाची तपासणी व  शुगर तपासणी करण्यात आली .

    सभेला प्रमुख उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून उदघाटन करण्यात आलं, माविम प्रार्थना इतनी शक्ती घेण्यात आली व सभेला उपस्थित मान्यवर यांच स्वागत कार्यक्रम घेण्यात आला .

    सभेला ग्रामीण रुग्णालय मुरुड च्या वैद्यकीय अधीक्षक सौ सुनीता पाटील, पशुसवर्धन चे  बायस सर, गुंज संस्था चे  अजित कांकरिया, Rseti लातूर चे  सतीश कांबळे, जिल्हा समन्वय अधीकारी मन्सूर पटेल सर, सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी  टेकाळे सर, सहाय्यक सहनियंत्रण  वाघमार, हिंदुस्थान फीड चे  डॉ बोरुरे सर हे उपस्थित होते.

     सभेच प्रस्ताविक व्यवस्थापक  विवेक स्वामी , अरुणा कदम यांनी केल यामध्ये साधन केंद्र अंतर्गत केलेल्या कामाची माहिती दिली ,नंतर ग्रामीण रुग्णालय अधीक्षक सुनीता पाटील यांनी  ग्रामीण रुग्णालयातील विविध योजना बाबत माहीती देऊन सभेला  दिली, महिला आरोग्य महिलांचे आजार शासकीय योजना याबाबत माहिती दिली Adco  टेकाळे सर यांनी महिलाना नवतेजस्विनी अंतर्गत करण्यात येणारे सबप्रोजेक्ट वैयक्तिक कर्ज, cmegp व pmegp अंतर्गत च्या विविध शासकीय योजना बाबत माहिती दिली  सतीश कांबळे सर यांनी Rseti अंतर्गत देण्यात येणारे प्रशिक्षण ब्युटीपार्लर, शिवणकाम, शेळीपालन कुकूटपालन, मसाला व्यवसाय याबाबत माहिती दिली पासुसंवर्धन विभाग चे डॉ बायस सर यांनी पशु संवर्धन विभाग च्या विविध योजना याबाबत मार्गदर्शन केले गुंज संस्था चे अजित कांकरिया यांनी संस्थे चा कामकाज व झाडें लावा झाडे जगवा याबाबत माहिती दिली शेवटी जिल्हा समन्वय अधिकारी पटेल सर यांनी महिला मार्गदर्शन करताना अतिगरीब महिला कर्ज उपलब्ध करणे wash कर्ज, वैयक्तिक कर्ज बचत गट कर्ज विविध शासकीय कर्ज योजना obc महामंडळ योजना याबाबत मार्गदर्शन केले तसेच उत्कृष्ट ग्रामसंघ उद्योजक महिला, माविम मित्र मंडळ, उत्कृष्ट mlp, व crp यांचे मान्यवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सभेच सूत्रसंचालन सहयोगिनी जयश्री वाघचौरे, यांनी केल आभार लेखापाल महेश पांचाळ यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपजीविका सल्लागार अमर भिसे, सहयोगिनी राधबाई घोडके ,जयश्री पांचाळ व सर्व crp यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. या कार्यक्रमासाठी सर्व महिला सभासद पदाधिकारी उपस्थित होते.


    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad