Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    लोकसभेसाठी पुण्यात भाजप देणार नवा गडी! मुरलीधर मोहोळांचा पत्ता होणार कट?

     



    लोकसभेसाठी पुण्यात भाजप देणार नवा गडी! मुरलीधर मोहोळांचा पत्ता होणार कट?


    राजकीय पक्षांकडून आगामी लोकसभा निवडणूक २०२४ च्या तयारीला सुरूवात करण्यात आली आहे. जवळपास सर्वच राजकीय पक्ष निवडणूकीची रणनिती आखण्यात गुंतले आहेत. यादरम्यान पुण्यात लोकसभा निवडणूकीत भाजपचा उमेदवार कोण असेल यावरून राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. यातच पुणे लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीसाठी आणखी एक नवीन नाव पुढे आले आहे.

    पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचं नेतृत्व कोण करणार यावरून अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. यामध्ये माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक, माजी राज्यसभा खासदार संजय काकडे आणि दिवंगत भाजप नेते गिरीष बापट यांच्या सूनबाई स्वरदा बापट यांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत आहेत.

    मात्र आता पुणे लोकसभेसाठी उमेदवार म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवरक संघाचे माजी प्रचारक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर यांचं नाव पुढे आलं आहे. सुनिल देवधर हे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. देवधर यांच्याबद्दल भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व देखील गंभीररित्या विचार करत असल्याची माहिती आहे. साम टीव्हीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad