Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    "मुरुड येथे अवैध दारू विक्री जोमात मुरुड पोलीस स्टेशन कोमात" अवैध धंदे जोमात तर नागरिक कोमात




     "मुरुड येथे अवैध दारू विक्री जोमात मुरुड पोलीस स्टेशन कोमात"

    अवैध धंदे जोमात तर नागरिक कोमात


    अवैध दारू बंद करण्यासंदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहराध्यक्ष ची मागणी:- आल्टे

    (बीट अंमलदाराचे अवैध दारू विक्रीकडे दुर्लक्ष का ?)

    मुरुड प्रतिनिधी( श्रीकांत टिळक) : - मौजे मुरुड तालुका जिल्हा लातूर येथील दारू विक्री कायमची बंद करण्यासंदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महिला शहराध्यक्ष आम्रपाली आल्टे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक लातूर, राज्य उत्पादन शुल्क लातूर यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. तसेच या दारू विक्री संदर्भात  पोलीस स्टेशन यांना दिनांक १८/०८/२०२३ रोजी निवेदन दिले होते पण ही अवैध दारू विक्री बंद झाली नाही.
    दिलेल्या निवेदनात विस्तृत म्हटले आहे की, मुरुड येथे दत्तनगर, पारुनगर, रमाई नगर, रेल्वे स्टेशन रोड, शिवाजीनगर, ठोंबरे नगर, आदी ठिकाणी राजरोसपणे पोलिसाची भीती न बाळगता देशी दारू हातभट्टी दारू विकत आहे. याविषयी मुरुड येथील विविध पक्ष संघटना आदीने मुरुड पोलीस स्टेशन यांना निवेदन दिले होते पण अद्यापही अवैध दारू विक्री बंद झालेले नाही.
    या अगोदर दारू विक्रीमुळे अनेकांचे संसार उदध्वस्त झाले असून नवयुवक तरुण पिढी पूर्णतः या दारूच्या आहारी गेली आहे तसेच बऱ्याच जणांचे आरोग्य धोक्यात आले असून, बऱ्याच जणांचे लिव्हर खराब झाली आहेत काहीजण तर काय बद्दल दारू पिऊन मरण पावले आहेत.
    या अवैध दारू विक्रेत्यावर कायदेशीर कार्यवाही करून कायमचा बंदोबस्त करण्यात यावा तसेच मुरुड पोलीस स्टेशनचे प्रमुख व संबंधित बीटा मलदार यांना या प्रकरणी जाब विचारावा कारण यांच्या दुर्लक्षतेमुळे मुरुड मध्ये दारू विक्री राजगोसपणे सुरू आहे. यावर पोलीस अधीक्षक यांनी कडक अंमलबजावणी करावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच या निवेदनाची प्रत राज्य उत्पादन शुल्क यांनाही देण्यात आली आहे.




    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad