माटेफळ येथे वृक्ष लागवड सप्ताह निमित्त कार्यक्रम माटेफळ आदर्श गाव संकल्प व संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
माटेफळ येथे वृक्ष लागवड सप्ताह निमित्त कार्यक्रम
माटेफळ आदर्श गाव संकल्प व संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
लातूर ( नवनाथ शिंदे ) तालुक्यातील आदर्श गाव माटेफळ येथे सोमवारी वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान अंतर्गत वृक्ष लागवड सप्ताह निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी माटेफळ आदर्श गाव संकल्प व संपर्क कार्यालयाचे उद्घाटन रोहयोच्या उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रक्षा शिंदे. गटविकास अधिकारी तुकाराम भालके साहेब, तालुका कृषी अधिकारी दिलीप राऊत, कृषी पर्यवेक्षक योगेश मुळजे. ग्रामसेवक श्रीकांत मुंडे कृषी सहाय्यक विरनाथ सूर्यवंशी उपस्थित होते
कै.वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान अंतर्गत स्मशानभूमी येथे वृक्ष लागवड करून वृक्ष लागवड सप्ताह साजरा केला, शेतकरी बाबा ओव्हाळ यांच्या सीताफळ फळबागेत वृक्ष लागवड करून बागेची पाहणी केली.जिल्हा परिषद शाळेत शहीद स्मारकाचे भूमीपुजन केले.त्यानंतर हनुमान मंदिरात सत्कार समारंभ केल्यावर मान्यवरांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. यावेळी घर तिथे झाड या पद्धतीने वृक्ष रोपण करण्याचे आव्हान उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ यांनी केले.यावेळी सरपंच विठ्ठल खोसे,उपसरपंच संजय शिंदे,सोसायटीचे चेअरमन प्रशांत खोसे,बळीराजा संस्थेचे अध्यक्ष नवनाथ शिंदे,ॲड.विनायक शिंदे, पदमाकर भिसे शुभम खोसे,परसराम ओव्हाळ, दिलीप पाटील,भाऊसाहेब खोसे, बापू खोसे,दौलत खोसे,प्रताप खोसे,रमेश कांबळे,बालाजी गुटलकर व महिला पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.खोसे यांनी केले तर आभार सरपंच विठ्ठल खोसे यांनी मानले.
No comments