शुक्रवारी 29 सप्टेंबर रोजी शासकीय सुट्टी जाहीर, गर्दी आणि मिरवणुकांच्या नियोजनासाठी सरकारचा निर्णय

 







शुक्रवारी 29 सप्टेंबर रोजी शासकीय सुट्टी जाहीर, गर्दी आणि मिरवणुकांच्या नियोजनासाठी सरकारचा निर्णय


मुंबई: अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जन (Ganeshostav) आणि ईद-ए- मिलादचा (Eid-E-Milad) सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवारी ( 28 सप्टेंबर) होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवार 29 सप्टेंबर रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. 

ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विनंती केली होती. राज्यात शांततेचे वातावरण असावे आणि गर्दी तसेच मिरवणुकांचे नियोजन करता येणे पोलिसांना शक्य व्हावे म्हणून 29 तारखेस सुट्टी देण्याची विनंती त्यांनी केली होती. या शिष्टमंडळात खासदार राहुल शेवाळे, आमदार अबू आझमी, आमदार रईस खान, नसीम खान आदींचा समावेश होता.

 या शिष्टमंडळात खासदार राहुल शेवाळे, आमदार अबू आझमी, आमदार रईस खान, नसीम खान आदींचा समावेश होता.

 

यंदा गणेशोत्सव  आणि ईद-ए-मिलाद हे सण एकत्रच 28 सप्टेंबरला आले आहेत. यामुळे पोलीस प्रशासनावर बराच ताण येण्याची शक्यता वर्तवली जात होती. हाच ताण कमी करण्यासाठी मुस्लिम बांधवांकडून ईद- ए- मिलाद च्या दिवशी काढण्यात येणारा जुलूस किंवा मिरवणूक ही सप्टेंबर 29 म्हणजे एक दिवस नंतर काढण्यात येणार आहे.

ईद-ए-मिलाद 28 सप्टेंबरला असली तरीही शांतता आणि सुव्यवस्थेच्या हितासाठी जुलूस किंवा मिरवणूक हि एक दिवस पुढे ढकलल्यास कोणतीही अडचण येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. 

ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या या निर्णयामुळे मुंबई पोलिसांच्य वतीने त्यांचे आभार मानण्यात आले आहेत. 

Post a Comment

Previous Post Next Post