दयानंद शिक्षण संस्थेत 75 वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा
ला. 17 दयानंद शिक्षण संस्था संचलित सर्व महाविद्यालयाच्या वतीने संस्थेच्या प्रांगणात मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा 29 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले तर विद्यापीठ वर्धापन दिनाचे ध्वजारोहण संस्था सदस्य तथा विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड यांच्या हस्ते करण्यात आले.या ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी ज्यांनी महाविद्यालय व शिक्षण संस्थेच्या नावलौकिकात भर टाकली अशा गुणीजन प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा सन्मान दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी यांनी केला. यामध्ये दयानंद विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थीनी सृष्टी जगताप हीने सलग 126 तास नृत्य करुन गिनीजबुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदविले, विज्ञान महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. महेश बेंबडे यांचा स्वा.रा.ती.म. विद्यापीठ उपकेंद्र, लातूर येथे सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल, दयानंद विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे हिंदी विषयाचे अध्यापक प्रा. प्रकाश बांगड सेवानिवृत्त होत असल्यामुळे, दयानंद वाणिज्य महाविद्यालयातील प्रा. विशाल वर्मा यांची स्वा.रा.ती.म. विद्यापीठ, नांदेड अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक (Area Co-ordinator) म्हणून निवड झाल्याबद्दल, प्रा. डॉ. साईनाथ उमाटे यांची राष्ट्रीय स्तरावरील ऑफिसर ट्रेनिंग, कामठी-नागपूर यांचेकडून लेफ्टनंट पदी नियुक्ती झाल्याबद्दल, दयानंद कला महाविद्यालयातील संगीत विभागाचे प्रा. डॉ. संदीपान जगदाळे यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल उपरोक्त सर्व गुणवंत प्राध्यापकांचा सन्मान करण्यात आला. दयानंद कला महाविद्यालयातील नॅक पीअर टीम समोर सादरीकरण केलेल्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या पथसंचलनाचे प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी दयानंद कला महाविद्यालयातील संगीत विभागाच्या वतीने महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीत सादर करण्यात आले.
या प्रसंगी दयानंद शिक्षण संस्था सदस्य ॲड. माधवराव इंगळे, दयानंद शिक्षण संस्था संचलित सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, एन.सी.सी. कॅडेट, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ध्वजारोहण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य अनिलकुमार माळी यांनी केले.
No comments:
Post a Comment