'विघ्नहर्ता' जनतेसमोरील सर्व अडथळे दूर करील, एकनाथ शिंदेंची गणेशाचरणी प्रार्थना!
Ganesh Chaturthi: आज १९ सप्टेंबरपासून गणपती उत्सवाला सुरुवात झाली आहे. घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी गणपतीच्या मूर्तीची स्थापना करून पूजा केली जात आहे. महाराष्ट्रात गणेश चतुर्थी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दरम्यान मख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेश चतुर्थीनिमित्त त्यांच्या निवासस्थानी प्रार्थना केली
एकनाथ शिंदे म्हणाले, "मी सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा देतो. मी काल जम्मू-काश्मीरमध्ये होतो. श्रीनगरच्या लाल चौकात लोक गणेशोत्सव साजरा करत होते. 'विघ्नहर्ता' महाराष्ट्रातील जनतेसमोरील सर्व अडथळे दूर करील अशी मी प्रार्थना करतो."
गणेश चतुर्थी हा सण दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यावेळी मंदिरापासून घरोघरी गजाननाची प्रतिष्ठापना केली जाते. विघ्नांचा नाश करणाऱ्या श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्याच्या परंपरेसह भाविक गणेशाची पूजा करतात. राजकीय नेत्यांच्या घरी देखील बाप्पांचे आगमन झाले आहे.

नरेंद्र मोदींनी दिल्या मराठीत शुभेच्छा!
सर्व देशवासीयांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया!, असे मोदी यांनी 'X' वर म्हटले आहे.
No comments:
Post a Comment