'शरद पवार सरकारमध्ये असताना मराठ्यांना आरक्षण का मिळालं नाही?'

 


'शरद पवार सरकारमध्ये असताना मराठ्यांना आरक्षण का मिळालं नाही?'

नागपूरशरद पवार (Sharad Pawar) सरकारमध्ये असताना मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation)  का मिळालं नाही, याचं उत्तर त्यांनी कधीच दिलं नाही, अशी परखड टीका सांस्कृतिक कार्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली आहे. शरद पवार 1960 पासून मराठा आरक्षणाबद्दल आश्वासन देत आहेत आणि आता ते मराठा आरक्षण देण्यात अपयशी ठरले म्हणून ते जबाबदारी आमच्यावर टाकत आहे, अशी घणाघाती टीका देखील मुनगंटीवारांनी केली आहे.

मुनगंटीवार म्हणाले, सरकार आणि ओबीसी प्रतिनिधींच्या बैठकीत संवादातून समाधान निघेल असा विश्वास आहे.. सरकार ओबीसी आंदोलनाबद्दल गंभीर आहे. आज सरकार सोबत संवाद झाल्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात ओबीसी प्रतिनिधींना स्पष्टता येईल आणि समाधान निघेल. शरद पवार 1960 पासून मराठा आरक्षणाबद्दल आश्वासन देत आहेत आणि आता ते मराठा आरक्षण देण्यात अपयशी ठरले म्हणून ते जबाबदारी आमच्यावर टाकत आहे.  शरद पवार सरकारमध्ये असताना मराठ्यांना आरक्षण का मिळाला नाही याचे उत्तर त्यांनी कधीच दिलं नाही.. शालिनीताई पाटील यांना एका मागणीसाठी पक्षातून का काढलं याचे उत्तर त्यांनी कधीच दिलं नाही. 

राजकीय पक्षाचे नेते अस्थिरता निर्माण करत आहे

महाराष्ट्रात काही राजकीय पक्षाचे नेते अस्थिरता निर्माण व्हावी यासाठी पूर्ण शक्तीने प्रयत्न करत असतात. कारण त्यांना वाटते अस्थिरतेच्या पायऱ्यावरच त्यांची सत्ता निर्माण होऊ शकते .  सध्याच्या स्थितीवर नजर ठेवून  आहे त्याला एका लगेच हे लक्षात येईल की सध्या अस्थिरता कोण निर्माण करत आहे? राज्यात एवढे उपोषण होत असताना शरद पवार कधीच कुठल्याच उपोषणाला नाही गेले. धनगर समाजाच्या उपोषणाला का कधी शरद पवार गेले नाही  कारण त्यांना माहित आहे की या सगळ्या गोष्टीतून अस्थिरता निर्माण करण्यामध्येच आपल्याला संधी आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले. 

ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाची सरकारसोबत आज बैठक

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसीकरण करू नये, तसेच इतर 27 मागण्यासाठी आज ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाची सरकारसोबत सह्याद्रीमध्ये बैठक होणार आहे. त्यासाठी नागपुरातून मोठ्या प्रमाणावर ओबीसी नेते मुंबईला निघाले आहे. सरकारने ओबीसी समाजाच्या आंदोलनाची दखल घेऊन आज बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच महत्त्वाचे ओबीसी नेते आणि मोठ्या संख्येने ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीत राहणार आहे आणि चर्चा होऊन नक्कीच समाधान निघेल असा विश्वास भाजप नेते परिणय फुके यांनी व्यक्त केला आहे.






Post a Comment

Previous Post Next Post