Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण तर, चांदी चांगलीच चकाकली, पाहा आजचा भाव

 


Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण तर, चांदी चांगलीच चकाकली, पाहा आजचा भाव

नवी दिल्ली : सप्टेंबर महिन्यात सोन्याच्या दरात लक्षणीय पडझड पाहायला मिळाली तर चांदीच्या भावातही उलथापालथ सुरूच राहिली. नोव्हेंबर महिन्यापासून लग्नसराईचा हंगाम सुरू होणार असून लग्नसमारंभात लोक सोने-चांदीची मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. अशा परिस्थितीत आज म्हणजेच शुक्रवारी, एकीकडे सोन्याच्या भावात घसरण होत असतानाच दुसरीकडे चांदीची चमकही वाढताना दिसत आहे. त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही सोन्याचे दागिने किंवा चांदीची भांडी खरेदीचा विचार करत असाल तर त्याआधी सराफा बाजारातील सोने-चांदीच्या किंमती नक्की तपासा.

सोने आणि चांदी खरेदी करण्यापूर्वी बाजारातील दर जाणून घेणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे जेणेकरून आजची खरेदी तुमच्यासाठी किती फायदेशीर ठरू शकते आणि कोणत्या शहरात सोन्या-चांदीच्या किमती किती आहेत हे समजू शकेल.

सोन्या-चांदीचा आजचा भाव
२९ सप्टेंबर रोजी देशांतर्गत वायदे बाजारात सोन्या आणि चांदीच्या किंमतीत वाढ नोंदवली गेली आहे. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवसाच्या सुरुवातीच्या सत्रात सोन्याचे दर ५७ हजार ९०० रुपयांच्या जवळ हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) डिसेंबर सोन्याचे फ्युचर्स ५७ हजार ८९० रुपये प्रति १० ग्रॅम वर सपाट राहिले तर चांदीचे डिसेंबर वायदे १.२३ टक्के किंवा ८६८ वाढीसह ७१ हजर ४६८ रुपये प्रति किलोवर पोहोचले.

दुसरीकडे, गुडरिटर्न्सच्या ताज्या आकडेवारीनुसार सोन्याचा भाव सुमारे अडीचशे रुपयांनी स्वस्त झाला आहे तर चांदीच्या किंमतीत एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट १० ग्रॅम सोने २५० रुपये घसरून ५३ हजार ६५० रुपये तर २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव २७० रुपये घसरून ५८ हजार ५३० रुपये झाला आहे.

भारतात सोने-चांदीची किंमत
देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमती सामान्यत: जागतिक आर्थिक परिस्थिती, चलनवाढीचा दर, चलनातील चढ-उतार आणि स्थानिक मागणी तसेच पुरवठा यासह विविध घटकांनी अवलंबून असतात. देशभरात सोन्याचे सांस्कृतिक महत्त्व, गुंतवणुकीचे मूल्य आणि विवाहसोहळा व सणांमध्ये पारंपारिक भूमिकेमुळे सोन्याला खूप महत्त्व असते.

दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या वायदे भावात आज सुधारणा दिसून आली. कॉमेक्सवर सोने १८८२.३० डॉलर प्रति औंसवर उघडले तर कॉमेक्सवर चांदीचा भाव $२२.८४ वर खुला झाला.

Post a Comment

Previous Post Next Post