एस.टी.बस व कंटनेरचा भीेषण अपघातात ; बस वाहक ठार

 एस.टी.बस व कंटनेरचा भीेषण अपघातात ; बस वाहक ठार




चांदवड,नाशिक - मुंबई,आग्रा महामार्गवर चांदवड पेट्रोल पंप चौफुलीवर गुरुवार दि.२८ सप्टेंबर 2023 रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास मालेगाव कडून येणारा कंटेनर (एम एच 04 / के यु 6654) हा नाशिककडे जात असतांना चांदवड मार्गे मनमाडला जाणारी एस.टी बस ( क्रमांक एम एच 40 एन 9419 ) यांच्यात भीषण अपघात झाला आहे.अपघात इतका भीषण होता की,एस.टी.चा मागचा भाग कापला गेला आहे.अपघातामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती.पण क्रेन मागवण्यात आल्यानंतर एस.टी दूर करण्यात आली. एस.टी.चे वाहक बी.एस. दळवी (वय 50) रा परभणी, नांदेड हे जागीच ठार झाले आहे.एस.टी बस पेट्रोल पंप चौफुलीवरुन वळण घेऊन चांदवडकडे जात असतांना मागच्या डाव्या बाजूला कंटेनरने भीषण धडक दिली. सुदैवाने एस.टी.बसमध्ये दोन मुले व एक मुलगीच असल्याने मोठा अनर्थ टळला.बस चालक बबन सिताराम वडवक्ते यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून चांदवड उपजिल्हा रुग्णालय,चांदवड येथे औषध उपचार घेत आहेत.जखमी शालेय तीन विद्यार्थीमध्ये जयेश दौलत आहेर वय 17, रा.भुत्याने,राकेश संजय भवर वय 17, रा.पुरी हे दोघे किरकोळ जखमी तर विद्या शामराव आहेर वय 17 रा.भुत्याने या विद्यार्थिनींचा डावा हात फॅक्चर झाला आहे.तर बस चालक बबन सिताराम वडवक्ते (वय 57) रा.खादगाव ता.नांदगाव हे पण जखमी झाले आहेत. मागील आठवड्यातच चांदवडला अपघात होऊन चौघेजण ठार झाले होते.








Post a Comment

Previous Post Next Post