Shetkari Samvad Yatra: सरकार शेतकऱ्यांच्या 'दारी'... योजनांची देणार माहिती! शेतकरी संवाद यात्रेचा शुभारंभ - latursaptrangnews

Breaking

Thursday, September 28, 2023

Shetkari Samvad Yatra: सरकार शेतकऱ्यांच्या 'दारी'... योजनांची देणार माहिती! शेतकरी संवाद यात्रेचा शुभारंभ

 






Shetkari Samvad Yatra: सरकार शेतकऱ्यांच्या 'दारी'... योजनांची देणार माहिती! शेतकरी संवाद यात्रेचा शुभारंभ

Shetkari Samvad Yatra: शिवसेनेच्या शेतकरी सेनेच्या वतीने राज्यभरात सुरू होणाऱ्या शेतकरी संवाद यात्रेचा शुभारंभ आज ठाणे येथील टेंभीनाका येथे करण्यात आला. ही यात्रा राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांची माहिती देणे, त्यांना त्या योजनांचे थेट लाभ मिळवून देणे तसेच वेगळ्या पद्धतीने शेती करून शेती फायद्यात आणून दाखवणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांशी त्यांचा संवाद साधून त्यांना नाविन्यपूर्ण शेतीबाबत अवगत केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे शेतकऱ्यांबद्दल कायमच संवेदनशील होते. त्यांच्याच प्रेरणेतून सुरू करण्यात आलेल्या शेतकरी संवाद यात्रेच्या माध्यमातून शिवसेना शेतकरी सेनेचे पदाधिकारी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घेणार आहेत. त्यातील काही प्रश्नांचे जागच्या जागी निराकरण करण्यात येणार असून मी स्वतः त्या शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्याचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी पुढाकार घेणार आहे.


यावेळी शेतकरी सेनेचे अध्यक्ष धनंजय जाधव, नाथराव कराड, समन्वयक योगेश्वर रायते तसेच राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेले प्रगतिशील शेतकरी आणि शेतकरी सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment