१५ ऑगष्ट १९४७ भारत देश स्वातंत्र्य झाला पण हैद्राबाद राज्य झाले नाही - latursaptrangnews

Breaking

Sunday, September 17, 2023

१५ ऑगष्ट १९४७ भारत देश स्वातंत्र्य झाला पण हैद्राबाद राज्य झाले नाही



 १५ ऑगष्ट १९४७ भारत देश स्वातंत्र्य झाला पण हैद्राबाद राज्य झाले नाही

अंबुलगा (बु) तालुका निलंगा येथील हुतात्मा सत्यन्नप्पा तेली यांच्या बलीदानामुळे ४०० रझाकाराची छावणी उध्वस्त करण्याचा संकल्प केलेले ४ स्वांतत्र्य बहादूर स्वांतत्र्य सैनिकाची हृदयभेदक कथा.
अंबुलगा (बु) हे मध्यम वस्तीचे गांव समिश्र जातीची वस्ती असलेले. येथे मुस्लीम वतनदार, गढीया वाढा, व गावात मुस्लीमाची संस्था चांगली होती. त्यांचा गावावर दरारा होता. त्या गावाचा प्रमुख पाटील न्यायमतखान यांच्या बद्दल चांगले मत गावात होते.
परंतू त्यांच्याच कुंटुंबातील काही जण सत्तेचा उन्माद बाळगुन गावात दहशत निर्माण केली होती. गावात बहुसंख्य मुस्लीम असल्यामुळे सत्तेचा आगोदरच दरारा होता. त्याच वेळी गावात रझाकाराचा शिरकाव झाला, गावातील हिन्दू, जनतेवर अन्याय आत्याचार, लुटपाट, व स्त्रियावर आन्याय करने सुरू केले यावर येथील तरूण बेभान झाले. रझाकाराचा दैनिक आत्याचार वाढु लगला, याच वेळी गावातील (एक) भगिनीची रझाकारनी विटबंना केली. गावात चिड निर्माण झाली व औराद येथील पं. विरभदुजी आर्य याना बोळातून त्याच्या नेतृत्वाखाली १९३५ साली आर्य समाजची स्थापना केली. एक शक्तीशाली संघटन निर्माण झाले. व्यायाम, लाठी काठी दैनिक सत्संग चालू झाला. याचवेळी अंबुलगा बुद्रुक येथे ४०० रजाकारांची छावणी पडली. त्याला सत्तेचा खूप उन्माद होता. अशातच हिंदूचा शिमगा व मोहरम सण एकत्र आले. शिमगा सण साजरा करण्यासाठी हिंदू तरूण खूप ताकदीने एकत्र आले. दोन्हीकडून सण साजरा करीत असताना शिमगा उत्सवावर रझाकारांनी हल्ला केला. त्यात सत्यन्नप्पा तेली नावाचे आर्य समाजी हुतात्मा झाले. हुतात्मा स्थंबावर क्रमांक एक वर त्यांचे नाव कोरले आहे. हुतात्मा सत्यन्नप्पा तेली यांच्या बलीदानामुळे गावातील तरूण मजबूतपणे एकत्र आले. व रझाकारावर वचक बसविण्याच्या निर्णय झाला. गावातील पारावरच्या गडीची घेरावबंदी केली. चार पाच दिवस गढीच्या बाहेर जणावर, ढोर, माणूस, कोणी पाखरू देखील बाहेर पडू दिले नाही. रझाकार व पाटील भयभित झाले. अखेर गाव पाटील यांनी गावातील प्रतिष्ठीत सावकार झूसंगप्पा यांना विनंती करून मुक्या जनावारांचा काय दोष, थोडी जिम्मेदारी घेवून आमच्यावर दया करा विनंती मुळे गावातील सावकाराच्या शब्दाला किंमत देवून थोडी मुक्ती दिली.
थोड्याच दिवसात रझाकारांनी पुन्हा डोके वर काढले, व तेथे काशीम रिझवी येवून गेल्याची चर्चा झाली. चारशे रझाकार सकाळ, संध्याकाळ परेड करू लागले व बोटकूळ गावावर हल्ला केला. घनघोर लढाई झाली. बोटकूळ, हनमंतवाडी, संंबुळगा बु., हलगरा परीसरातील तरूणांनी निकराची झूंज दिली व बोटकूळ गाव जाळल्याची अफवा पसरली. स्व स्वरक्षासाठी परिसरातील गावे सजग झाली व रझाकारांना पळवून लावले. याचे नेतृत्व अंबुलगा येथील आर्यसमाजी व्यक्तीने केले.
अंबुलगा बु.येथील ४०० रझाकाराची छावणी बॉम्बने उडवून देण्याचा संकल्प केला गेला. त्यात चार तरूणांनी शपथ घेतली गेली. १. नामदेवराव सगर, २. चंद्रकांतजी आर्य, ३. रामचंद्रजी शिंदे, ४. चंद्राम रेड्डी आनंदवाडी अ.बु. यांनी बार्शी येथे कॅम्पवर जाऊन बॉम्ब उडविण्याचे प्रशिक्षण घेतले. तेथील भगवंताच्या मंदिरात त्यांच्या खान्यापिन्याची सोय केली गेली. हे विर तरूण शिक्षण पूर्ण घेवून प्रत्येकी चार चार बॉम्ब घेवून धराशिव मार्गे अंबुलगा बु.कडे पुढे पुढे सरकत होते. रमजान ईद दिवशी नमाज पडणार्‍या रझाकारावर बॉम्ब हल्ला करण्याचा संकल्प केला होता. व तयारीही पूर्ण झाली होती हे चार विर तरूण बार्शीहून आडमार्गाने निघाले होते. पोलीस चौकी ठाणे चुकवित निघाले होते. त्यांना भादा ता.औसा येथे पोलीस चौकी असल्याचे ठावूक नव्हते. वेळ सांज काळची होती. गावाच्या वेशीजवळच पोलीस चौकी होती. नेमके त्याचवेळी त्या भागात दरोडा पडला होता. पोलीस जाणार्‍या येणार्‍यावर लक्ष ठेवून होते. पोलीस ठाण्यासमोर हे विर तरूण जात असताना पोलीसांनी त्यांना हटकलेच, हे सर्व जण प्रकृतीने धष्टपुष्ट असल्यामुळे त्यांना ते चोर असल्याचा संशय आला. प्रवासामुळे अंगावर कपडे मळके होते, संशयाने पोलीसांना पाठलाग केला पंरतू दुर्देवाने बैलगाडी अडवी आली व त्यांना पकडले. त्यांचे जवळ मोठी पिशवी होती. तुम्ही...कोण...तुमच्या जवळ काय आहे ?  अशी विचारणा होत असताना त्यांची नजर कावरी बावरी बघून पोलीस सतर्क झाले. त्यावेळी कुठले...कुठे गेलो होतो...अशी विचारणा करत असताना आम्ही वारकरी आहोत, पंढरीला गेलो होतो, अशी उत्तरे त्यांच्या कडून देण्यात आली. त्यावेळी साखरेवर बंदी होती. त्यांचेजवळ साखर असेल तर साखर घेवून पोलीस सोडून देणार होते. परंतू तेथील ठाणे अमलदार याने पिशवीत हात घातल्यानंतर घट्ट घट्ट कांहीतरी हाताला लागले, त्यांनी दुसर्‍या वरील सहकार्यांना बोलावल्याचे त्यांनी पाहिले तो चालत होता. त्यांनी बाँब असल्याचे ओळखले. चार विर तरूण पळून जाऊच शकत नाहीत असे पोलीसांना वाटले. त्यांना दोरखंडा बांधून जायबंद केले होते. खूप मोठ्या प्रमाणावर मारझोड झाली. व बिदरहून पोलीस प्रमुख आला. हॉलेदस त्याचे पद त्यांनी सांगीतलेले पदनाम त्यांनी तपास केला व म्हणाला याचा पर्चा कशाला केला ?  यांना लांब नेहून विशारी बॉनेट खपसून मारून का टाकले नाही व उंचा शिंदीच्या बनात नेवून मारून टाका असा अदेश दिला हे त्याचे बोलने एका हिंदू पोठोड्याने एकले. त्यांना यातना देत असलेले तो पहात होता. त्यांना जेवणे खाने काही दिले जात नव्हते. खापरी येळणीमध्ये पाणी दिले जात असे. हा छळ पाठोड्यांनी पाहिला. गावानी एक वतनदार मोहनसिंग राजपूत यांना सांगीतले. या चार कैद्यांना उद्या मारून टाकणार आहेत त्यावेळी मोहनसिंगांची देशभक्ती झाली. त्यांनी गावातील तरूणांना एकत्र करून गुपचूप निरेप देवून पोलीसस्टेशन समोर तरूणांची फळी जमवली. त्यांना पाहूण घाबरले व तपासाचे निमीत्ताने झडती होत असताना झडतीचे निमित्तकरून ठार करण्याचा कट होता हे मोहनसिंग यांच्या लक्षात आले व चार विरांना अम्ही मारणार याचीही जाणीव झाली. त्यावेळी धीटपणाही चद्रनाथजी आर्य यांनी आंतीम उदगार काढले, मोठया आवाजात म्हणाले, हिंदू बांधवानो हे धाडस आम्ही केवळ आमच्यासाठी केले नाही. सर्व हिंदू समाज मुक्त व्हावा यासाठी केला आहे, असे अवहान करताच मोहनसिंग राजपूत यांनी आमीनाचा हात धरला व कायदेशीर कार्यवाही करा असा हट्ट केला. त्यांनी आमनांनी त्यांना ठार मारण्याचे रद्द केले. त्यांना कोठडीत ठेवून अगनित अत्याचार केले गेले. मरत यातना दिल्या गेल्या. त्याचवेळी मराले असते तर बरे झाले असते असे वाटू लागले. यांना परत अंबूलगा बु. येथे अधिक तपाससाठी अणण्यात आले. त्यांचे नातेवाईक व सहकारी मारझोड करण्यात आली. या चारविरांन चावडीवर दोरखांडाने बांधून ठेवले गेले. गाव भयभित होवून गावातील सर्व लोक गाव सोडून गेले. गावासमोर मारझोड  करण्यात येवू लागली. त्यांना जेवण तर नाहीच पण पाणीही दिले गेले नाही. नामदेवराव सगर यांनी पाणी मागीतले असता अमिनाबीने त्यांच्या तोंडात लघवी केली. फौजदाराच्या घोड्याला हरभार्‍याचे ढहाळे व गवत कोेतवाला तर्फेे आणून टाकायचे होते, घोड्याची खालेले उष्टे बुरकंडे चंद्रनाथजी आर्य खाण्यास सुरवात केली त्यावेळी फौजदारंनी त्यांच्या तोंडावर बुटाची लाथ मारली त्यात त्यांचे दात पडले. असा अमानुष छळ केला. तरीही हे विर घाबरले नाहीत. त्यांना लातूर येथील पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. त्यांची सुटका नाही व जामीनही झाली नाही. शेवटी १७ सप्टेंबर १९४८ उजाडले. हैद्राबाद राज्य रझाकाराच्या अन्यायातून मुक्त झाले. पोलीस पळून गेले, मात्र यांना सोडावयास कोणीच नव्हते. अंबुलगा बु.चे अडते भिमसिंह राजपूत यांना हे ठावूक होते, त्यांनी एक लोहार घेवून पोलीस कोठडीचे दार व कूलूप मोडून या चार स्वातंत्र्य विरांना मुक्त केले व हैद्राबाद मुक्तीचा अंनद साजरा केला गेला. हि माहिती त्यांच्या स्वतःच्या तोंडून ते हयात असताना मला एकवली व नोंद करून ठेवली. जयहिंद !

ओमप्रकाश आर्य
अंबुलगा बु.
मो.नं. ८६६८७७३०७९



No comments:

Post a Comment