चांदवड युवक काँग्रेस ने 'पदवी प्रमाण पत्राला श्रद्धांजली' वाहून साजरा केला बेरोजगार दिवस.
आज चांदवड तालुका युवक काँग्रेसच्या वतीने मा.आ शिरीषभाऊ कोतवाल,बाजार समिती सभापती संजयजी जाधव,महासचिव गौरव पानगव्हाणे,जिल्हाध्यक्ष जयेश पोकळे,युवा नेते राहुल कोतवाल यांच्या मार्गर्शनाखाली व चांदवड विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष दिपांशू जाधव यांच्या नेतृत्वाखाली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 'पदवी प्रमाण पत्राला श्रद्धांजली वाहून' बेरोजगार दिवस साजरा करण्यात आला...
नरेंद्र मोदींनी पंतप्रधान होण्यापूर्वी वर्षाला 2 कोटी रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते..पण उलट या भारताच्या तरूण पिढी ला रोजगार देण्याचे सोडून देशातील उद्योगधंदे चुकीच्या आर्थिक नियोजनाने बंद पाडून व सरकारी कंपन्या भांडवलदारांच्या घशात घालून आहे त्या रोजगार क्षेत्रात घट करण्याचे सुरू आहे. तसेच वेदांत फॉक्सकाँन ,IFSC,रायगड बल्क ड्रग असे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला पाठवून महाराष्ट्राचे उद्योग धंदे पळवण्याचे काम केलं आहे.
यावेळेस पंडित जाधव,कैलास सावकार,दिपक वाघ,पप्पू कोतवाल,दत्तू कोतवाल,धोंडीराम पिंपरकर,कैलास जाधव,दत्तू जाधव, अशोक जाधव,सोमनाथ जाधव,नंदू वाघ,केदू सावकार,दिपक जाधव, संजय जाधव, परशराम केदारे,बाबाजी जाधव, नारायण धामणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment